Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >बँकिंग > उद्योगांपासून वैयक्तिक गरजांपर्यंत... 'उधारी'वर चाललीये अर्थव्यवस्था? RBI ची धक्कादायक आकडेवारी

उद्योगांपासून वैयक्तिक गरजांपर्यंत... 'उधारी'वर चाललीये अर्थव्यवस्था? RBI ची धक्कादायक आकडेवारी

RBI Credit Growth Data : भारतीयांमध्ये कर्ज घेण्याचा वेग वेगाने वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बिगर-अन्न कर्जामध्ये वार्षिक तत्त्वावर १४.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:34 IST2026-03-31T11:16:23+5:302026-03-31T11:34:41+5:30

RBI Credit Growth Data : भारतीयांमध्ये कर्ज घेण्याचा वेग वेगाने वाढला आहे. रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बिगर-अन्न कर्जामध्ये वार्षिक तत्त्वावर १४.३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.

RBI Credit Growth Data: India's Non-food Credit Rises by 14.3% in February 2026 | उद्योगांपासून वैयक्तिक गरजांपर्यंत... 'उधारी'वर चाललीये अर्थव्यवस्था? RBI ची धक्कादायक आकडेवारी

उद्योगांपासून वैयक्तिक गरजांपर्यंत... 'उधारी'वर चाललीये अर्थव्यवस्था? RBI ची धक्कादायक आकडेवारी

RBI Credit Growth Data : देशांतर्गत अर्थव्यवस्थेत सध्या पैशांचा ओघ वाढल्याचे चित्र दिसत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सर्वसामान्य नागरिक असो वा मोठे उद्योग समूह, आपल्या गरजा आणि विस्तारासाठी बँकांकडे कर्ज मागणाऱ्यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यातील आकडेवारीनुसार, 'बिगर-अन्न कर्ज' पुरवठ्यात वार्षिक १४.३ टक्क्यांची जोरदार वाढ नोंदवण्यात आली आहे.

उद्योग आणि पायाभूत सुविधांना 'बुस्टर'
आरबीआयने देशातील ९५ टक्के बाजारपेठ व्यापणाऱ्या ४१ प्रमुख बँकांकडून गोळा केलेल्या माहितीनुसार, उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जामध्ये मोठी झेप पाहायला मिळाली आहे. गेल्या वर्षी उद्योगांची कर्जवृद्धी केवळ ७.५ टक्के होती, जी आता वाढून १३.५ टक्के झाली आहे. पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी, रसायने, पेट्रोलियम आणि कापड उद्योगातून कर्जाची सर्वाधिक मागणी दिसून आली आहे. या क्षेत्रात १६.३ टक्के वाढ झाली असून, प्रामुख्याने एनबीएफसी आणि कमर्शियल रिअल इस्टेटकडून मोठी मागणी आली आहे.

'पर्सनल लोन' आणि चैनीच्या वस्तूंसाठी उधारी वाढली

  • बँकिंग क्षेत्रातील सर्वात रंजक आकडेवारी 'पर्सनल लोन' विभागातून समोर आली आहे. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आणि वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले आहे.
  • वाढ: वैयक्तिक कर्ज विभागात १५.२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
  • वाहन आणि गोल्ड लोन: गृहकर्जामध्ये स्थिरता दिसत असली तरी, कार/वाहन कर्ज आणि गोल्ड लोन (सोने तारण कर्ज) घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
  • शेती: कृषी आणि संबंधित कामांसाठीच्या कर्जातही १२.३ टक्क्यांची सुधारणा झाली आहे.

वाचा - गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! पीपीएफ, सुकन्या समृद्धीचे व्याजदर स्थिर; १ एप्रिलपासून 'हे' असतील नवे दर

अर्थव्यवस्थेसाठी हे शुभसंकेत की धोक्याची घंटा?
कर्ज घेण्याचे वाढते प्रमाण हे दर्शवते की लोकांची खरेदीशक्ती वाढत आहे आणि उद्योजक नव्या गुंतवणुकीसाठी तयार आहेत. मात्र, पर्सनल लोनमधील अतिवाढ पाहता, कर्जदारांनी आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. आरबीआयच्या या अहवालामुळे बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून सर्वच क्षेत्रांत पैशांचा प्रवाह वाढल्याचे स्पष्ट होत आहे.
 

Web Title : क्या कर्ज पर चल रही अर्थव्यवस्था? RBI के चौंकाने वाले आंकड़े।

Web Summary : RBI के आंकड़ों के अनुसार, सभी क्षेत्रों में क्रेडिट में उल्लेखनीय वृद्धि हुई है। बुनियादी ढांचे के कारण औद्योगिक ऋणों में वृद्धि हुई। व्यक्तिगत ऋण, विशेष रूप से वाहनों और सोने के लिए, में भी वृद्धि देखी गई। बढ़ती उधार शक्ति बढ़ती क्रय शक्ति का सुझाव देती है, लेकिन व्यक्तियों के लिए पुनर्भुगतान क्षमता पर विचार करने की आवश्यकता है।

Web Title : Economy fueled by debt? RBI reveals startling credit growth figures.

Web Summary : RBI data shows significant credit growth across sectors. Industrial loans surged, driven by infrastructure. Personal loans, especially for vehicles and gold, also saw a rise. Increased borrowing suggests growing purchasing power, but repayment capacity needs consideration for individuals.