lokmat Supervote 2024
Lokmat Money >बँकिंग > महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर RBI ची कारवाई, पैसे काढण्यासह अनेक निर्बंध; जाणून घ्या

महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर RBI ची कारवाई, पैसे काढण्यासह अनेक निर्बंध; जाणून घ्या

RBI Action On Co-Operative Bank : रिझर्व्ह बँकेनं (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. या बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादण्यात आलेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:56 AM2024-04-24T11:56:17+5:302024-04-24T11:56:42+5:30

RBI Action On Co-Operative Bank : रिझर्व्ह बँकेनं (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. या बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादण्यात आलेत.

RBI action on konark urban co operative bank in Maharashtra ulhasnagar many restrictions including withdrawals find out | महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर RBI ची कारवाई, पैसे काढण्यासह अनेक निर्बंध; जाणून घ्या

महाराष्ट्रातील 'या' सहकारी बँकेवर RBI ची कारवाई, पैसे काढण्यासह अनेक निर्बंध; जाणून घ्या

RBI Action On Co-Operative Bank : रिझर्व्ह बँकेनं (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. राज्यातील उल्हासनगर येथे असलेल्या कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेकडून कारवाई करण्यात आली. या बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादण्यात आलेत. बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनकडून (DICGC) त्यांच्या ठेवींमधून ५ लाख रुपयांपर्यंतच्या विमा दाव्याची रक्कम मिळू शकते.
 

बँकिंग नियमन कायदा, १९४९ च्या कलम ३५ए अंतर्गत कोणार्क अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध २३ एप्रिल २०२४ (मंगळवार) रोजी कामकाज बंद झाल्यापासून लागू झाले. लादलेल्या निर्बंधांमुळे बँक कोणतंही कर्ज आणि अॅडव्हान्सेस मंजूर किंवा त्याचं नूतनीकरण करू शकत नाही. कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व ट्रान्सफर करू शकत नाही किंवा आरबीआयच्या परवानगीशिवाय त्याच्या कोणत्याही मालमत्तेबाबत निर्णय घेऊ शकत नाही.
 

काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं?
 

“बँकेची सध्याची रोख स्थिती लक्षात घेऊन, सर्व बचत खाती किंवा चालू खाती किंवा ठेवीदाराच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. परंतु कर्ज समायोजित करण्याची परवानगी आहे," असं आरबीआयनं म्हटलंय. यावर निर्बंधांचा अर्थ बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय असा समजू नये. बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग ऑपरेशन्स सुरू ठेवेल असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

Web Title: RBI action on konark urban co operative bank in Maharashtra ulhasnagar many restrictions including withdrawals find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.