Lokmat Money >बँकिंग > ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य

ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य

एटीएमच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळायची असेल तर कार्ड टाकण्यापूर्वी एटीएम मशिनवर दिलेल्या पर्यायांपैकी कॅन्सल बटण दोनदा दाबा! सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच व्हायरल होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:17 IST2025-05-08T11:16:35+5:302025-05-08T11:17:26+5:30

एटीएमच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळायची असेल तर कार्ड टाकण्यापूर्वी एटीएम मशिनवर दिलेल्या पर्यायांपैकी कॅन्सल बटण दोनदा दाबा! सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच व्हायरल होत आहे

pressing Cancel button twice before a transaction at an ATM stop PIN theft See the truth behind the claim fact check | ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य

ATM मध्ये व्यवहारापूर्वी दोनदा 'Cancel' बटण दाबलं तर पिन चोरी थांबवू शकता का? पाहा दाव्यामागील सत्य

एटीएमच्या माध्यमातून होणारी फसवणूक टाळायची असेल तर कार्ड टाकण्यापूर्वी एटीएम मशिनवर दिलेल्या पर्यायांपैकी कॅन्सल बटण दोनदा दाबा! सोशल मीडियावर ही बातमी चांगलीच व्हायरल होत आहे. असं केल्यानं एटीएम फ्रॉड टाळता येऊ शकतो, असा दावा अनेकांनी केलाय. आता या प्रकरणी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं (PIB) फॅक्ट चेक रिपोर्ट जारी केला आहे.

एटीएम कार्ड सुरक्षेचं सत्य काय?

एटीएम मशिनमध्ये दोनवेळा कॅन्सल बटण दाबण्याची बातमी सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं (पीआयबी) नुकतीच या व्हायरल पोस्टचे खंडन केलंय. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, एटीएम पिन चोरला जाऊ नये म्हणून आरबीआयनं एटीएम व्यवहारापूर्वी कॅन्सल बटण दोनदा दाबण्याचे निर्देश दिले होते. पीआयबी फॅक्ट चेकनं हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलंय. आरबीआयकडून असे कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत, असं पीआयबीकडून सांगण्यात आलंय. अशा कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत संकेतस्थळावरून मिळालेल्या माहितीवरच विश्वास ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय.

एटीएम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी येथे काही टिप्स :

सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत, अशा सूचना आरबीआयकडून वेळोवेळी ग्राहकांना दिल्या जातात. एटीएम कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स.

  • एटीएमचा पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका, मग तो तुमच्या कितीही जवळचा असो.
  • एटीएम पिन टाकताना कीपॅड नेहमी झाकून ठेवा जेणेकरून तो कोणालाही दिसणार नाही.
  • शक्यतो निर्जन किंवा संशयास्पद ठिकाणी असलेल्या एटीएममधून व्यवहार करणं टाळावं.
  • एटीएम कार्डनं व्यवहार करताना स्टॉल आणि कीपॅड तपासा. कारण फसवणूक करणारे स्किमिंग डिव्हाइसचा वापर करून फसवणूक करतात.
  • आपल्या बँक खात्याशी संबंधित एसएमएस किंवा अलर्ट तपासत रहा जेणेकरून आपल्याला सर्व प्रकारच्या व्यवहारांची माहिती वेळेवर मिळू शकेल. कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत व्यवहाराची स्थिती कळताच तात्काळ कारवाई करून बँकेला कळवावं.
  • आरबीआय किंवा बँकेच्या नावानं कोणत्याही कॉल किंवा मेसेजमध्ये आपला एटीएम पिन किंवा इतर कोणतीही गोपनीय माहिती देणं टाळा.
  • एटीएमचा पासवर्ड नियमित बदलावा.
  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फेक न्यूज टाळा. नेहमी अधिकृत स्त्रोतांवर अवलंबून राहा.
  • एटीएममध्ये कार्ड क्लोनिंग टाळण्यासाठी ईएमव्ही चिप-आधारित कार्डवापरा. संशयास्पद हालचाली झाल्यास तत्काळ बँकेच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.
  • ऑनलाइन व्यवहारांसाठी नेहमी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनचा वापर करा.

Web Title: pressing Cancel button twice before a transaction at an ATM stop PIN theft See the truth behind the claim fact check

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक