Lokmat Money >बँकिंग > फोन पे आणि गुगल पे ला मिळाली २ वर्षांची मुदतवाढ! काय आहे सरकारच्या डोक्यात?

फोन पे आणि गुगल पे ला मिळाली २ वर्षांची मुदतवाढ! काय आहे सरकारच्या डोक्यात?

Phonepe And Google Pay : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. NPCI ने PhonePe आणि Google Pay या थर्ड-पार्टी अ‍ॅप्सची UPI मधील मार्केट शेअर २ वर्षांनी कमी करण्यासाठी मुदत वाढवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 12:03 IST2025-01-01T12:02:07+5:302025-01-01T12:03:11+5:30

Phonepe And Google Pay : ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. NPCI ने PhonePe आणि Google Pay या थर्ड-पार्टी अ‍ॅप्सची UPI मधील मार्केट शेअर २ वर्षांनी कमी करण्यासाठी मुदत वाढवली आहे.

phonepe and google pay get 2 years more to cut upi market share | फोन पे आणि गुगल पे ला मिळाली २ वर्षांची मुदतवाढ! काय आहे सरकारच्या डोक्यात?

फोन पे आणि गुगल पे ला मिळाली २ वर्षांची मुदतवाढ! काय आहे सरकारच्या डोक्यात?

Phonepe And Google Pay : ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू झाल्यापासून आर्थिक व्यवहार सुलभ झाले आहेत. आता पूर्वीसारखं रोख रक्कम सोबत बाळगण्याची गरज नाही. मोबाईल खिशात टाकला की झालं काम. बाजारात असंख्य पेमेंट अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. मात्र, यात सर्वाधिक वाटा हा गुगल पे आणि फोन पे यांचा आहे. या दोघांशिवाय पानही हलत नाही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुम्ही यापैकी कोणतंही अ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) PhonePe आणि Google Pay या थर्ड पार्टी ॲप्सची UPI मधील मार्केट शेअर कमी करण्यासाठी २ वर्षांची मुदत वाढवली आहे. याशिवाय, व्हॉट्सअ‍ॅपसाठी १० कोटी वापरकर्त्यांची ऑनबोर्डिंग मर्यादा देखील काढून टाकण्यात आली आहे. NPCI ने मुदत वाढवण्याची ही दुसरी वेळ आहे. याचा तुमच्यावर काय परिमाण होईल? असाच प्रश्न मनात आला ना? चला जाणून घेऊ.

बाजारात नवीन भिडूच्या प्रवेशानंतरही PhonePe आणि Google Pay ने आपला दबदबा कायम ठेवला आहे. या दोघांचा बाजार हिस्सा अनुक्रमे ४८% आणि ३७% इतका आहे. NPCI ने नोव्हेंबर २०२० मध्ये, ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत कोणत्याही थर्ट पार्टी अ‍ॅप प्रदात्याकडे एकूण UPI व्यवहार व्हॉल्यूमच्या ३०% पेक्षा जास्त मार्केट शेअर नसावा, अशी घोषणा केली होती.

येस बँकेवर बंदी घातल्यानंतर ही मर्यादा लागू करण्यात आली होती. येस बँकेवरील बेलआउटमुळे PhonePe व्यवहारांवर परिणाम झाला आणि UPI व्हॉल्यूम एका रात्रीत जवळपास ४०% कमी झाले. म्हणजे लोकांना आर्थिक व्यवहार करण्यात अडचणी येऊ लागल्या होत्या. भविष्यात असा धोका टाळण्यासाठी NPCI ने असा निर्णय घेतला आहे. PhonePe ने UPI व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी अनेक बँकांशी भागीदारी केली आहे. दुसरीकडे, पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईमुळे त्यांचेही यूपीआय व्यवहार मंदावले आहेत. परिणामी PhonePe आणि Google Pay चा मार्केट शेअर वाढतच आहे.

ऑनलाईन आर्थिक व्यवहार किती होतात?
३० डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात २२.३ लाख कोटी रुपयांचे १,६१३ कोटी UPI व्यवहार झाले. पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचे चेअरमन विश्वास पटेल म्हणाले की, मार्केट कॅपमधील विस्ताराचे आम्ही स्वागत करतो. लोकांना डझनभर नवीन UPI ​​अ‍ॅप्समधून निवडण्याची संधी मिळेल. पेटीएमला पुन्हा बाजारात उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच नवी, क्रेड, भीम, व्हॉट्सअ‍ॅप पे आणि इतर यासारखे नवीन अ‍ॅप्स जोरात वाढत आहेत. बँकाही त्यांची UPI अ‍ॅप स्ट्रॅटेजी बनवत आहेत. पुढील २ वर्षात मार्केट कॅपची समस्या आपोआप दूर होईल.

वास्तिवक, बाजारात सध्याही अनेक स्पर्धक आहेत. मात्र, त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. जिथे नफा नाही तिथे व्यवहार वाढवण्यासाठी या कंपन्या खर्च करण्यास तयार नव्हत्या. याउलट अल्फाबेट कंपनी Google Pay आणि Walmart च्या मालकीच्या PhonePe ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते वाढवण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. नोटाबंदीच्या काळात NPCI चे BHIM अ‍ॅप पंतप्रधानांनी लॉन्च केले होते. परंतु, कंपनीने आपली रणनीती बदलल्यानंतर सुरुवातीची वेग गमावला. ज्या बँकांकडे त्यांचे स्वत:चे UPI अ‍ॅप नव्हते, त्यांना व्हाईट-लेबल सेवा म्हणून हे अ‍ॅप ऑफर करण्यात आले होते.

यूपीआय अ‍ॅप कसे पैसे कमावू शकतात?

अलीकडे भीम अ‍ॅपसाठी स्वतंत्र विभाग करण्यात आला आहे. NPCI या उत्पादनाला अधिक आक्रमकपणे पुढे नेण्याचा विचार करत आहे. UPI दररोज एक अब्ज व्यवहार साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे मत आहे. पेमेंट्स कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकारची व्हॉल्यूम आणि कमी ऑपरेटिंग कॉस्ट स्ट्रक्चर पाहता कंपनी मोठ्या व्यापाऱ्यांकडून थोडे शुल्क आकारूनही पैसे कमवू शकतील.

Web Title: phonepe and google pay get 2 years more to cut upi market share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.