Personal Loan Elegibility: अनेकजण आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी पर्सनल लोन घेतो. पर्सनल लोक, अगदी सहज उपलब्ध होणारे कर्ज आहे, जे तुमच्या अडचणीच्या काळात मदतीला येते. या कर्जासाठी तुम्हाला कोणतीही मालमत्ता वगैरे गहाण ठेवण्याची गरज नाही. या कारणास्तव याला आपत्कालीन कर्जदेखील म्हणतात. पण, पर्सनल लोन देण्यापूर्वी बँका ग्राहकाची पात्रता, म्हणजेच CIBIL स्कोअर तपासतात. पर्सनल लोनसाठी काय पात्रता असावी? पाहा...
पगार किती असावा?
वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कर्जदाराच्या पगाराचे निकष वेगळे असतात. साधारणपणे 15,000 ते 25,000 रुपये पगार असलेले लोक वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात. तुमच्या उत्पन्नाच्या आधारावर बँका ठरवतात की, तुम्हाला किती रक्कम कर्ज म्हणून द्यायची.
कोणत्या वयाचे लोक घेऊ शकतात
एचडीएफसी बँकेच्या म्हणण्यानुसार, जर तुम्ही किमान दोन वर्षे कुठेतरी काम करत असाल आणि तुमचे वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असेल, तर तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.
वैयक्तिक कर्ज कशासाठी वापरू शकता?
तुम्ही तुमच्या गरजेनुसार कुठेही वैयक्तिक कर्ज वापरू शकता, जसे की लग्न, उच्च शिक्षण, घराचे नूतनीकरण, प्रवास किंवा तुम्ही तुमच्या घरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रक्कम वापरू शकता.
किती कालावधीची परतफेड करावी
बहुतेक बँकांमध्ये वैयक्तिक कर्जाची परतफेड करण्यासाठी दिलेला कालावधी 12 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंत असतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार कालावधी निवडू शकता.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत
वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी अनेक कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. आयडी पुरावा, पत्ता पुरावा आणि उत्पन्नाचा पुरावा इत्यादी आवश्यक आहेत.
वैयक्तिक कर्जावरील व्याजदर किती आहेत?
तुम्ही HDFC बँकेकडून कर्ज घेतल्यास तुम्हाला 10.85% ते 24% व्याजदराने कर्ज मिळू शकते. याशिवाय जीएसटी + लोन प्रोसेसिंग चार्जेस देखील आकारले जातात. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर इतर बँकांमध्ये भिन्न असू शकतात.