NPCI UPI: भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये UPI चा वापर वाढला आहे. आतापर्यंत UPI द्वारे फक्त १ लाख रुपये पाठवता येत होते, पण आता १५ सप्टेंबर २०२५ पासून काही व्यवहारांसाठी ही मर्यादा १० लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. NPCI ने हा बदल जाहीर केला असून, यामुळे कर भरणे, विमा प्रीमियम भरणे, कर्जाचा EMI भरणे, शेअर बाजारात गुंतवणूक करणे यासारखे सुलभरित्या करता येणार आहेत.
हा बदल का करण्यात आला?
या वर्षी कर भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे. यामुळे NPCI ने कर संबंधित UPI व्यवहारांची मर्यादा प्रति व्यवहार ५ लाख रुपये आणि प्रति २४ तास १० लाख रुपये इतकी वाढवली आहे. याचा फायदा मोठे व्यवहार करणाऱ्या UPI वापरकर्त्यांना होईल.
नवीन मर्यादा कोणत्या व्यवहारांवर लागू होईल?
हे बदल फक्त P2M (Person to Merchant) व्यवहारांवर लागू होतील. म्हणजेच, तुम्ही एखाद्या रजिस्टर व्यापाऱ्याला जसे की विमा कंपनी, ब्रोकरेज फर्म, कर पोर्टल किंवा बँक इत्यादींना पेमेंट करता, त्यावर नवीन नियम लागू असतील. मात्र, P2P (Person to Person) व्यवहारांची मर्यादा अजूनही प्रतिदिन १ लाख रुपये राहील.
कोणत्या श्रेणींमध्ये मर्यादा वाढली आहे?
कर भरणा (MCC 9311): आता UPI द्वारे एका वेळी ५ लाख रुपये आणि २४ तासांत १० लाख रुपये भरता येतील.
विमा आणि भांडवल बाजार: पूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती, आता ती प्रति व्यवहार ५ लाख रुपये आणि प्रति दिवस १० लाख रुपये आहे.
कर्ज EMI, B2B संकलन: या सर्वांमध्ये प्रति व्यवहार ५ लाख रुपये आणि प्रति २४ तास १० लाख रुपये अशी मर्यादा आहे.
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट: पूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती, आता प्रति व्यवहार ५ लाख रुपये आणि दररोज ६ लाख रुपये अशी मर्यादा असेल.
परकीय चलन (FX रिटेल): आता परकीय चलन खरेदी आणि विक्रीसाठी देखील प्रति व्यवहार ५ लाख रुपयांची मर्यादा लागू असेल.
डिजिटल खाते आणि एफडी: आता डिजिटल बचत खाते उघडण्यासाठी आणि एफडी करण्यासाठी 5 लाख रुपयांपर्यंतच्या व्यवहार मर्यादाला परवानगी आहे.
या मर्यादा सर्व बँकांना लागू होतील का?
एनपीसीआयने ही मर्यादा सर्व बँका, अॅप्स आणि पेमेंट सेवा प्रदात्यांसाठी (पीएसपी) लागू करण्यास सांगितले आहे. परंतु, बँकांना त्यांच्या अंतर्गत धोरणांनुसार काही मर्यादा स्वतः निश्चित करण्याचे स्वातंत्र्य देखील देण्यात आले आहे. म्हणजेच, ही मर्यादा कोणत्याही बँकेत त्वरित उपलब्ध नसण्याची शक्यता आहे, परंतु बहुतेक बँका 15 सप्टेंबरपासून ती लागू करतील.
आयपीओसाठी मर्यादा काय आहे?
तुम्हाला यूपीआयद्वारे आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) मध्ये बोली लावायची असेल, तर येथे मर्यादा अजूनही प्रति व्यवहार 5 लाख रुपये असेल. आयपीओसाठी 10 लाख रुपयांची नवीन मर्यादा लागू होणार नाही.