Lokmat Money >बँकिंग > युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

UPI New Rules : एनपीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, वाढलेली मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर भरण्याच्या श्रेणीत येणाऱ्या संस्थांना लागू असेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 10:17 IST2025-09-14T10:15:42+5:302025-09-14T10:17:23+5:30

UPI New Rules : एनपीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, वाढलेली मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंतच्या कर भरण्याच्या श्रेणीत येणाऱ्या संस्थांना लागू असेल.

New UPI Rules: Now Pay Up to ₹10 Lakh Daily for Insurance and Investments | युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली

UPI New Rules : युपीआय आपल्यापासून आर्थिक व्यवहार करणे आता सुलभ झाले आहे. अगदी भाजीच्या जुडीपासून मोठे व्यवहार करण्यापर्यंत यूपीआयचा वापर होत आहे. तुम्हीही यूपीआय वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळाने (NPCI) युपीआय व्यवहारांच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे आणि आवश्यक बदल केले आहेत. हे नवे नियम सोमवार, १५ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. या बदलांमुळे सर्वसामान्य ग्राहकांसह, युपीआयचा वापर करणाऱ्या व्यापारी आणि दुकानदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

एनपीसीआयने विमा प्रीमियम, भांडवली बाजार आणि क्रेडिट कार्ड बिल पेमेंट यांसारख्या काही विशिष्ट श्रेणींसाठी युपीआय व्यवहाराची मर्यादा प्रति व्यवहार ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. या नव्या नियमांनुसार, तुम्ही अशा व्यवहारांसाठी एका दिवसात म्हणजेच २४ तासांमध्ये जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकाल. या व्यतिरिक्त, आणखी १२ श्रेणींसाठीही दैनंदिन व्यवहारांची मर्यादा वाढवण्यात येत आहे.

सामान्य युपीआय व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल नाही
एनपीसीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाढलेली ही मर्यादा ५ लाख रुपये पर्यंतच्या कर भरणीशी संबंधित संस्थांनाही लागू होईल. ही वाढलेली मर्यादा लागू झाल्यानंतर सरकारी ई-मार्केट प्लेस, प्रवास आणि व्यावसायिक व्यवहारांची मर्यादाही ₹५ लाख रुपये होईल. मात्र, व्यक्ती ते व्यक्ती (P2P) व्यवहारांसाठी दैनंदिन व्यवहार मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ, तुम्ही तुमच्या सामान्य युपीआय खात्यातून एका दिवसात जास्तीत जास्त १ लाख रुपयेच पाठवू शकाल.

कोणत्या व्यवहारांसाठी मर्यादा वाढली?
 

व्यवहाराची श्रेणी प्रति व्यवहार मर्यादा (रुपये)प्रतिदिन व्यवहाराची मर्यादा (रुपये)
भांडवली बाजार (गुंतवणूक) ₹५ लाख ₹१० लाख 
विमा ₹५ लाख ₹१० लाख 
सरकारी ई-मार्केट प्लेस ₹५ लाख₹१० लाख 
प्रवास ₹५ लाख ₹१० लाख 
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट | ₹५ लाख ₹६ लाख 
दागिने ₹५ लाख ₹६ लाख 
व्यवसाय/व्यापारी पेमेंट ₹५ लाख  
डिजिटल खाते उघडणे ₹५ लाख ₹५ लाख 
   

वाचा - जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

युपीआयचा वापर मोठ्या प्रमाणावर
युपीआय व्यवहारांच्या मर्यादेत केलेली ही वाढ स्पष्टपणे दर्शवते की, लोक आपल्या रोजच्या व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणावर युपीआयचा वापर करत आहेत. सुरुवातीच्या काळात युपीआयचा वापर केवळ दुकानांमधील छोट्या व्यवहारांसाठी केला जात होता, पण आता युपीआयचा वापर विविध प्रकारच्या मोठ्या पेमेंट्ससाठी केला जात आहे.

Web Title: New UPI Rules: Now Pay Up to ₹10 Lakh Daily for Insurance and Investments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.