Inactive Credit Card : क्रेडिट कार्डचा वापर आता सामान्य झाला आहे. आमची बँक तुम्हाला फ्री क्रेडिट कार्ड ऑफर करत असल्याचा एखादा तरी फोन तुम्हालाही आलाच असेल. मात्र, अनेकदा असे कार्ड आपण घेतो, दोनतीन वेळा वापरतो. मात्र, त्यानंतर तसेच घरात पडून राहतात. तुम्हाला जर असे वाटत असेल की यामुळे काही फरक पडत नाही. तर जागे व्हा. याचा परिणाम थेट तुमच्या क्रेडिट हेल्थ वर होतो. याचे तोटे आज आपण पाहणार आहोत.
किती काळाने क्रेडिट कार्ड निष्क्रीय केले जाते?
जर तुमचे क्रेडिट कार्ड तुम्ही दीर्घकाळ वापरलं नाही तर संबंधित बँक किंवा वित्तीय संस्थेकडून ते निष्क्रिय घोषित केले जाते. सहसा, क्रेडिट कार्ड ६ महिन्यांहून अधिक काळ वापरात नसेल तर बँक ही कारवाई करते. कार्ड निष्क्रीय करण्यापूर्वी बँक तुम्हाला ते सक्रीय ठेवण्यासाठी संधी देते. त्यामुळे अधूनमधून त्याचा वापर करत चला.
क्रेडिट स्कोअर कमी होऊ शकतो
तुमच्या क्रेडिट कार्डचा थेट संबंध क्रेडिट स्कोअरशी असतो. तुमचं खाते बंद झाले तर क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेव्हा तुमचे खाते बंद होते, तेव्हा तुमचा विद्यमान क्रेडिट स्कोअर कमी होतो, ज्यामुळे तुमचे क्रेडिट युटिलायझेशन गुणोत्तर वाढते. हे तुमच्या क्रेडिट लिमीटवर अवलंबून असते. क्रेडिट युटिलायझेशन हे सहसा तुमच्या क्रेडिट स्कोअरच्या ३० टक्के असते, त्यामुळे उच्च गुणोत्तर तुमचा स्कोअर खाली घसरू शकतो.
क्रेडिड कार्डवर दंड लागू शकतो
बहुतांश क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपन्या कार्डचा वापर न करण्यासाठी निष्क्रिय शुल्क किंवा दंड आकारत नाहीत. तरीही याबाबत अधिक माहितीसाठी क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीच्या ग्राहक सेवा विभागाशी संपर्क साधावा. कारण, नियम सातत्याने बदलत असतात. अशावेळी नाहक भुर्दंड लागू शकतो.
क्रेडिट कार्ड सक्रीय कसे ठेवावे?
- छोटे व्यवहार दर काही महिन्यांनी करावेत.
- तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासत राहिले पाहिजे.
- जर तुम्हाला क्रेडिट कार्डची गरज नसेल, तर बँकेशी संपर्क साधा आणि ते बंद करा.
- खाते निष्क्रिय झाले असल्यास, ते पुन्हा सक्रिय करण्यासाठी बँकेशी संपर्क साधा.