पंजाब नॅशनल बँक मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील तिसरी सर्वात मोठी सरकारी बँक आहे. जर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल म्हणजेच पीएनबीमध्ये तुमचं बँक खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. या प्रकरणी पीएनबीनं आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे. जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुम्ही या नोटिशीकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. पीएनबीनं आपल्या ग्राहकांना २३ जानेवारी २०२५ पूर्वी केवायसी तपशील अपडेट करण्यास सांगितलं आहे.
सर्व बँकिंग सेवांच्या अखंड वापरासाठी २३ जानेवारीपूर्वी केवायसी अपडेट करणं खूप महत्वाचं असं पीएनबीनं म्हटलंय. पीएनबी केवायसीच्या पिरिऑडिक अपडेशनसाठी बँकेद्वारे रिस्क बेस्ड अप्रोच अवलंबला जातो. उच्च जोखमीच्या ग्राहकांसाठी दर दोन वर्षांनी एकदा, मध्यम जोखमीच्या ग्राहकांसाठी दर ८ वर्षांनी एकदा आणि कमी जोखमीच्या ग्राहकांसाठी खाते उघडण्याच्या / शेवटच्या केवायसी अपडेशनच्या तारखेपासून दर १० वर्षांनी एकदा पिरिऑडिक अपडेशन केलं जाईल," असं बँकेच्या पिरिऑडिक अपडेशनमध्ये म्हटलंय.
कोणाला अपडेशनची गरज?
पंजाब नॅशनल बँकेनं म्हटलंय की, हे केवायसी अपडेशन अशा ग्राहकांसाठी लागू आहे ज्यांची खाती ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत अपडेट करायची होती परंतु त्यांनी ते अपडेट केलेलं नाही. जर एखाद्या ग्राहकानं २३ जानेवारीपूर्वी केवायसी तपशील अपडेट केला नाही तर त्यांच्या बँक खात्याच्या कामकाजावर निर्बंध येऊ शकतात, असं बँकेनं म्हटलंय. म्हणजेच जर एखाद्या ग्राहकाच्या खात्यातील कामकाजावर मर्यादा आल्या तर त्याच्या बँकेशी संबंधित अनेक महत्त्वाची कामे अडकू शकतात.
जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुम्ही ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत तुमच्या बँक खात्याची केवायसी अपडेट केली नसेल तर यावेळी केवायसी अपडेट करणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. जर तुम्ही २३ जानेवारीपूर्वी केवायसी अपडेट केलं नाही तर तुमच्या बँक खात्यात अनेक निर्बंध येऊ शकतात, जेणेकरून तुम्ही कोणतीही महत्त्वाची कामं करू शकणार नाही.