SBI Yono App: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या (SBI) कोट्यवधी ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही देखील भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सध्या एसबीआय ग्राहकांना त्यांच्या वॉट्सॲपवर स्टेट बँकेच्या नावानं एक मेसेज येत आहे.
या मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, जर एसबीआय ग्राहकांनी त्यांचे आधार अपडेट केलं नाही, तर त्यांचे SBI YONO मोबाईल ॲप ब्लॉक केलं जाईल. या मेसेजसोबत एक APK फाईल देखील पाठवली जात आहे आणि ती इंस्टॉल करण्यास सांगितली जात आहे.
नवीन वर्षात कोणती बँक देतेय स्वस्त दरात कार लोन: ७.४०% व्याजासह १० लाखांच्या कर्जावर किती असेल EMI?
व्हॉट्सॲपवर पाठवला जातोय मेसेज
जर तुम्हालाही भारतीय स्टेट बँकेच्या नावानं असा कोणताही मेसेज आला असेल, तर सर्वात आधी त्या व्हॉट्सॲप अकाउंटला रिपोर्ट करा आणि चुकूनही ती APK फाईल डाऊनलोड किंवा इंस्टॉल करू नका. एसबीआय ग्राहकांच्या वॉट्सॲपवर पाठवला जाणारा हा एक फेक मेसेज आहे, ज्याद्वारे लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या ग्राहकांना असा कोणताही मेसेज पाठवत नाहीये. हे एक बनावट वॉट्सॲप अकाउंट आहे, ज्याद्वारे ग्राहकांना ॲप ब्लॉक करण्याची भीती दाखवून त्यांच्यावर APK फाईल डाऊनलोड आणि इंस्टॉल करण्यासाठी दबाव टाकला जात आहे.
Is it true that your SBI YONO app will be blocked if you don’t update your Aadhaar❓
— PIB Fact Check (@PIBFactCheck) January 6, 2026
A message circulating on social media in the name of SBI claims that users must download and install an APK file to update their Aadhaar. It further claims that if Aadhaar is not updated, the… pic.twitter.com/wHf0KxCkk0
भारतीय स्टेट बँकेनं काय म्हटलं?
भारतीय स्टेट बँकेनं स्वतः आपल्या ग्राहकांसाठी एक पोस्ट शेअर केली असून कोणत्याही प्रकारच्या APK फाईलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, "APK फाईलवर क्लिक केल्यामुळे तुमच्या बँक खात्यात जमा असलेले सर्व पैसे दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर केले जाऊ शकतात."
एसबीआयनं स्पष्ट केलंय की, कोणत्याही APK फाईलवर क्लिक करू नका, डाऊनलोड करू नका किंवा अपडेट करू नका. बँकेनं केवळ गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअर वरूनच अधिकृत ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआय व्यतिरिक्त, PIB Fact Check ने देखील या संपूर्ण प्रकरणावर एक पोस्ट शेअर करत हा मेसेज फेक असल्याचं म्हटलंय.
