How to Change Burnt Note : तुमच्याकडे जुन्या, फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या नोटा असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अनेकदा अशा नोटा बँकेत घेण्यास टाळाटाळ केली जाते. आरबीआयने फाटलेल्या किंवा जळलेल्या नोटा बदलण्यासाठी काही नियम केले आहेत. ज्यांचे पालन प्रत्येक बँकेने केले पाहिजे. या परिपत्रकात किती फाटलेल्या, जुन्या किंवा जळालेल्या नोटा बदलता येतील, याची माहिती लिहिली आहे.
RBI चे नियम काय सांगतात?
२०१७ मध्ये रिझर्व्ह बँकेने नोटा बदलण्याबाबत परिपत्रक जारी केले होते. कोणतीही बँक फाटलेल्या किंवा जुन्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही, असे सांगण्यात आले. मात्र, यात सर्वच नोटांचा समावेश करण्यात आलेला नाही. अशा नोटा बँकेत बदलण्याऐवजी त्या आरबीआयच्या नियुक्त शाखेत जमा कराव्या लागतात.
किती जळालेल्या नोटा बदलून मिळतात?
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोटेचा काही भाग ५० टक्के जळाला असेल तर ती बँकेत बदलता येईल. यापेक्षा जास्त जळाली असल्यास, बँक ती स्वीकारू शकणार नाही. अशा नोटा आरबीआयच्या नियुक्त ऑफिसमध्ये बदलून मिळतील. या नोटांची पडताळणी करुन रिझर्व्ह बँक तुम्हाला या नोटेच्या मूल्याचा काही भाग परत करू शकतात. समजा तुम्ही ५०० रुपयांची जळलेल्या नोटा दिल्या असतील तर RBI त्याच्या बदल्यात ३०० रुपये देऊ शकते.
कोणत्या नोटा बदलण्यास अडचण येत नाही?
आरबीआयच्या नियमानुसार एखादी नोट खूप जुनी असेल तर ती काही बँकांमध्येच बदलून घेता येते.
पण, थोड्याफार फाटलेल्य किंवा मळालेल्या नोटा जर ओळखू येत असतील तर त्या कोणत्याही बँकेत बदलल्या जाऊ शकतात.
नोटेचा फाटलेला भाग गहाळ असल्यास प्रथम त्याची तपासणी केली जाते आणि नंतर बँक ती स्वीकारू शकते.
नोटेवर तेल किंवा रंगाचे डाग असल्यास बँका ती तपासून तुम्हाला तेवढेच मूल्य परत करू शकतात.
वाचा - बँकांच्या मिनिमम बॅलेन्स नियमामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री; हजारो कोटींचा दंड वसूल...
एकावेळी किती नोटा बदलता येतात?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार एका वेळी फक्त २० फाटलेल्या किंवा जळलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. जर नोटा जास्त मूल्याच्या असतील तर त्यांची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा जास्त नसावी. नोटांची संख्या यापेक्षा जास्त असल्यास किंवा रक्कम जास्त असल्यास नोट बदलण्यासाठी शाखा व्यवस्थापकाकडे लेखी अर्ज द्यावा लागेल. त्याच्या परवानगीनंतरच ती बदलता येते. बँकेने नोटा बदलण्यास नकार दिल्यास, तुम्ही RBI कस्टमर केअर नंबर 14440 वर मिस्ड कॉल देऊन तक्रार नोंदवू शकता. याशिवाय, तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा crpc@rbi.org.in वर ईमेल करून तक्रार करू शकता.