Lokmat Money >बँकिंग > बँक ऑफ इंडियाची तब्बल ₹ 226 कोटींची फसवणूक; 'या' पॉवर कंपनीवर आरोप...

बँक ऑफ इंडियाची तब्बल ₹ 226 कोटींची फसवणूक; 'या' पॉवर कंपनीवर आरोप...

Gupta Power Infra Bank Fraud: याच कंपनीने यापूर्वी PNB ची ₹ 270 कोटींची फसवणूक केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 19:12 IST2025-02-21T19:12:34+5:302025-02-21T19:12:45+5:30

Gupta Power Infra Bank Fraud: याच कंपनीने यापूर्वी PNB ची ₹ 270 कोटींची फसवणूक केली आहे.

Gupta Power Infra Bank Fraud: Bank of India defrauded by a whopping ₹ 226 crore; Gupta Power Infra accused | बँक ऑफ इंडियाची तब्बल ₹ 226 कोटींची फसवणूक; 'या' पॉवर कंपनीवर आरोप...

बँक ऑफ इंडियाची तब्बल ₹ 226 कोटींची फसवणूक; 'या' पॉवर कंपनीवर आरोप...


Gupta Power Infra Bank Fraud: सरकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पंजाब नॅशनल बँकेची 270 कोटी रुपयांची फसवणूक केल्यानंतर ओडिशाच्या गुप्ता पॉवर इन्फ्राने बँक ऑफ इंडियाचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बँकेने आरबीआयला संपूर्ण माहिती दिली आहे.

बँक ऑफ इंडियाची 226 कोटींची फसवणूक
शुक्रवारी बँक ऑफ इंडियाने आरबीआयला सांगितले की, ओडिशास्थित गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने बँकेसोबत 226.84 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. काही दिवसांपूर्वी पीएनबीनेही अशाच एका प्रकरणाची माहिती दिली होती. बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ​​226.84 कोटी रुपयांच्या एनपीएला फसवणुकीत टाकण्यात आले आहे. 

पंजाब नॅशनल बँकेचीही फसवणूक
PNB ने देखील RBI ला 270.57 कोटी रुपयांच्या फसवणुकीची माहिती दिली होती. मंगळवारी बँकेने आरबीआयला सांगितले की, याच गुप्ता पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरने बँकेसोबत 270.57 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. आता या दोन्ही प्रकरणाची माहिती आरबीआयला मिळाली असून, याप्रकरणातील पुढील कारवाई केली जात आहे.

Web Title: Gupta Power Infra Bank Fraud: Bank of India defrauded by a whopping ₹ 226 crore; Gupta Power Infra accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.