दिवाळी आली की कुठे, किती ऑफर्स आहेत, हे तपासून खरेदी होत असल्याचं पुन्हा दिसलं आहे. यंदा ४२% क्रेडिट कार्डधारकांनी ५० हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदी केली असल्याचं 'पैसा बझार'च्या सर्वेक्षणात आढळलं. २२% लोकांनी ५० हजार ते १ लाख रुपये खर्च केले, तर २०% लोकांनी १ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. सणासुदीत लोक महागड्या वस्तू क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करतात, असं दिसतं.
नियोजन करून खरेदी
९१% वापरकर्त्यांनी कार्डवरील ऑफर्स पाहून नियोजन करून खरेदी केली, तर १० टक्के लोकांनी नेहमीच्या रिवॉईसवर समाधान मानलं. कॅशबॅक हा सर्वाधिक पसंतीचा लाभ (२० टक्के) ठरला, त्यानंतर को-ब्रँड ऑफर्स (१९ टक्के) आणि एक्स्ट्रा रिवॉर्ड पॉइंट्स (१८ टक्के) आले.
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
सर्वेक्षण अहवालानुसार, सर्वाधिक २५ टक्के खर्च गृहोपकरणांवर झाला. याशिवाय मोबाइल, गॅझेट्स व अॅक्सेसरीजवर २३ टक्के, कपड्यांवर २२ टक्के, फर्निचर आणि सजावटीवर १८ टक्के तसंच सोनं व अलंकारांवर १२ टक्के खर्च झाला.
नो-कॉस्ट ईएमआय हवे
५६% 8 लोकांनी नो-कॉस्ट ईएमआय निवडले.
२९% लोकांनी अधिक सवलती शोधल्या.
