HDFC Home Car Loan Interest Rate : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेनं ग्राहकांना झटका दिला आहे. एचडीएफसीनं काही मुदतीतील कर्जावरील एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे. हा एमसीएलआर दर केवळ ओव्हरनाईट कालावधीसाठी वाढविण्यात आला आहे. पूर्वी तो ९.१५ टक्के होता, तो आता ९.२० टक्के करण्यात आलाय. अन्य कालावधीच्या एमसीएलआरमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. एचडीएफसी बँकेचा नवा एमसीएलआर दर ७ डिसेंबर २०२४ पासून लागू झालाय.
MCLR वाढल्यानं काय परिणाम होतो?
बँकेच्या एमसीएलआरमध्ये सुधारणा केल्यानं गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जासह सर्व प्रकारच्या फ्लोटिंग लोनच्या ईएमआयवर परिणाम होतो. एमसीएलआर वाढला की कर्जाचं व्याज वाढतं आणि विद्यमान ग्राहकांचा ईएमआय वाढतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही कार किंवा घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कर्ज महाग मिळेल. याशिवाय जे आधीच ज्यांचं कर्ज सुरू आहे त्यांच्यासाठी त्यांच्या मासिक कर्जाचा ईएमआय वाढतो. एचडीएफसी बँकेनं यावेळी ओव्हरनाईट पीरिअडच्या एमसीएलआरमध्ये ०.०५ टक्क्यांनी वाढ केली आहे.
काय आहेत नवे एमएलसीआर?
- एचडीएफसी बँकेचा एमसीएलआर ९.१५ टक्क्यांवरून ९.२० टक्क्यांवर गेला आहे.
- एक महिन्याचा एमसीएलआर ९.२० टक्के आहे. यात बदल करण्यात आलेला नाही.
- तीन महिन्यांचा एमसीएलआर ९.३० टक्के आहे. यातही बदल करण्यात आलेला नाही.
- सहा महिन्यांचा एमसीएलआर ९.४५ टक्के आहे. यातही बदल करण्यात आलेला नाही.
- एक वर्षाचा एमसीएलआर ९.४५ टक्के आहे. यात बदल करण्यात आलेला नाही.
- दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर ९.४५ टक्के आहे. यात बदल करण्यात आलेला नाही.
- ३ वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी एमसीएलआर ९.५० टक्के आहे. यात बदल करण्यात आलेला नाही.