How to block Credit Cards : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत नसाल तर तो पांढरा हत्ती पोसण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही खर्च करत नसला तरी विविध वार्षित शुल्क तुमच्यावर लादले जातात. अशा परिस्थितीत तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचे असेल. किंवा तुमच्यासोबत फसवणूक होत असेल आणि तुम्हाला ती कायमची थांबवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकदा बँक क्रेडिट कार्ड बंद करण्यास टाळाटाळ करते. कारण, यात त्यांचे नुकसान होणार असते. अशा वेळी क्रेडिट कार्डवरील आरबीआयचे नियम माहिती असणे आवश्यक आहे. जेणेकरून बँक तुमचे क्रेडिट कार्ड बंद करत नसेल, तर तुम्ही रिझर्व्ह बँकेच्या नियमांचा हवाला देऊन कार्ड बंद करण्यास सांगू शकता.
क्रेडिट कार्डांबाबत आरबीआयचे नियम सांगतात की, जर एखाद्या बँकेने क्रेडिट कार्ड बंद केले नाही किंवा उशीर केला तर तिला दररोज ५०० रुपये दंड भरावा लागेल. यासाठी काही गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही बँकेला कोणतीही माहिती न देता कार्ड बंद करण्यास सांगितले तर ते तुम्हाला गोष्टींमध्ये अडकवू शकतात.
बँकेला दररोज भरावा लागेल ५०० रुपये दंड
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने क्रेडिट कार्ड जारी करणे आणि बंद करणे याबाबत काही नियम केले आहेत. आरबीआयच्या नियमांनुसार, जर एखाद्या ग्राहकाने त्याचे क्रेडिट कार्ड बंद करण्यासाठी अर्ज केला तर बँकेला ७ दिवसांच्या आत त्यावर काम सुरू करावे लागेल. कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुम्ही बँकेला ई-मेल करू शकता. कार्डशी संबंधित प्रत्येक माहिती तुम्ही ईमेलमध्ये टाकू शकता.
थकबाकी भरणे आवश्यक
कार्ड बंद करण्याचा अर्ज करण्यापूर्वी तुमची सर्व देणी परत केल्याची खात्री करावी. यामध्ये ईएमआय, कर्ज, शिल्लक हस्तांतरण इत्यादींचा समावेश आहे. सर्व देय रक्कम भरली नसल्या बँक तुमचा विनंती फेटाळू शकते.
रिवॉर्ड पॉइंट वापरा
क्रेडिट कार्ड व्यवहारातून रिवॉर्ड पॉइंट क्रेडिट कार्डवर जमा होतात. हे कार्डधारकाने वापरले पाहिजेत. कार्ड रद्द केल्यास हे सर्व फायदेही जातात.
रद्द केल्यानंतर कार्ड वापरू नका
क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यानंतर ते वापरू नका. तुम्हाला ज्या तारखेला बंद करायचे आहे त्या तारखेच्या एक महिना आधी कोणताही व्यवहार करू नका. यामुळे बँक तुमचे कार्ड तपासेल आणि ब्लॉक करेल. कोणताही व्यवहार बाकी असल्यास ते ब्लॉक केले जाणार नाही.