नवी दिल्ली : जुलै २०२५ मध्ये विविध सण-उत्सव व साप्ताहिक सुट्ट्या यामुळे एकूण १३ दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहे. यात ४ रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार यांचा समावेश आहे.
यातील सर्व सुट्ट्या सर्वच राज्यांत नाहीत. त्यामुळे राज्यनिहाय सुट्यांची संख्या कमी जास्त होईल. भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या यादीनुसार जुलैमधील बँकांच्या सुट्या पुढीलप्रमाणे आहेत.
३ जुलै : खर्ची पूजा, त्रिपुरा
५ जुलै : गुरु हरगोविंदसिंहजी जन्मोत्सव, जम्मू-काश्मीर
६ जुलै : रविवार, देशभर
१२ जुलै : दुसरा शनिवार, देशभर
१३ जुलै : रविवार, देशभर
१४ जुलै : बेह दीन्खलाम, मेघालय
१६ जुलै : हरेला सण, उत्तराखंड
१७ जुलै : यू तिरोतसिंह पुण्यतिथी, मेघालय
१९ जुलै : केरपूजा, त्रिपुरा
२० जुलै : रविवार, देशभर
२६ जुलै : चौथा शनिवार, देशभर
२७ जुलै : रविवार, देशभर
२८ जुलै : द्रुक्पा त्से-जी, सिक्कीम