Lokmat Money >बँकिंग > बँक ऑफ बडोदामध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹४७,०१५ चे निश्चित व्याज; जाणून घ्या...

बँक ऑफ बडोदामध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹४७,०१५ चे निश्चित व्याज; जाणून घ्या...

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 19:44 IST2025-09-21T19:43:02+5:302025-09-21T19:44:02+5:30

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना आकर्षक व्याजदर देते.

Bank of Baroda Savings Scheme: Deposit ₹2,00,000 and get a fixed interest of ₹47,015 | बँक ऑफ बडोदामध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹४७,०१५ चे निश्चित व्याज; जाणून घ्या...

बँक ऑफ बडोदामध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹४७,०१५ चे निश्चित व्याज; जाणून घ्या...

Bank of Baroda Savings Scheme: बँक ऑफ बडोदा केंद्र सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना FD वर आकर्षक व्याजदर देते. बँक ऑफ बडोदामध्ये किमान ७ दिवसांपासून ते जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी FD खाती उघडता येतात. यावर ३.५०% ते ७.२०% पर्यंत व्याज मिळते. या बँकेत तुम्ही फक्त २ लाख रुपये जमा करुन, ₹४७,०१५ चे निश्चित व्याज मिळवू शकता.

सर्वाधिक व्याज ४४४ दिवसांच्या एफडीवर

४४४ दिवसांच्या कालावधीच्या एफडीवर सर्वाधिक व्याज मिळते.

सामान्य ग्राहकांना ६.६०%

वरिष्ठ नागरिकांना (६०+) ७.१०%

सुपर वरिष्ठ नागरिकांना (८०+) ७.२०%

३ वर्षांच्या एफडीवरही चांगला परतावा 

सामान्य ग्राहकांना ६.५०%

वरिष्ठ नागरिकांना ७.००%

सुपर वरिष्ठ नागरिकांना ७.१०%

२ लाख रुपयांवर किती मिळेल परतावा?

ग्राहकाने २ लाख रुपये ३ वर्षांसाठी एफडीमध्ये गुंतवले, तर त्यानुसार परतावा असा असेल:

सामान्य ग्राहक (<६० वर्षे) – मॅच्युरिटीवर ₹२,४२,६८२ मिळतील, ज्यात ₹४२,६८२ व्याज समाविष्ट.

वरिष्ठ नागरिक (६०+ वर्षे) – मॅच्युरिटीवर ₹२,४६,२८८ मिळतील, ज्यात ₹४६,२८८ व्याज समाविष्ट.

सुपर वरिष्ठ नागरिक (८०+ वर्षे) – मॅच्युरिटीवर ₹२,४७,०१५ मिळतील, ज्यात ₹४७,०१५ व्याज समाविष्ट.

ग्राहकांना फायदा

या योजनांमुळे विशेषतः वरिष्ठ व सुपर वरिष्ठ नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. बँक ऑफ बडोदाची एफडी योजना सुरक्षित आणि हमीशीर परतावा देणारी ठरत असून सणासुदीच्या काळात गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय मानली जात आहे.

Web Title: Bank of Baroda Savings Scheme: Deposit ₹2,00,000 and get a fixed interest of ₹47,015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.