Lokmat Money >बँकिंग > बँकेचे काम असेल तर लगेच आटपा! जूनमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार; RBI कडून कॅलेंडर जाहीर

बँकेचे काम असेल तर लगेच आटपा! जूनमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार; RBI कडून कॅलेंडर जाहीर

Bank Holidays List : दरवर्षीप्रमाणे, यावेळीही आरबीआयने जून महिन्यासाठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे. हे कॅलेंडर पाहून तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे नियोजन आत्ताच करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:17 IST2025-05-27T14:23:20+5:302025-05-27T16:17:48+5:30

Bank Holidays List : दरवर्षीप्रमाणे, यावेळीही आरबीआयने जून महिन्यासाठी सुट्टीचे कॅलेंडर जारी केले आहे. हे कॅलेंडर पाहून तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे नियोजन आत्ताच करू शकता.

bank holidays in june 2025 banks in india to closed on thsese 12 days check full list | बँकेचे काम असेल तर लगेच आटपा! जूनमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार; RBI कडून कॅलेंडर जाहीर

बँकेचे काम असेल तर लगेच आटपा! जूनमध्ये १२ दिवस बँका बंद राहणार; RBI कडून कॅलेंडर जाहीर

Bank Holidays in June 2025 : मे महिना संपायला आता काहीच दिवस उरले आहेत आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुढील महिन्याचे म्हणजेच जून २०२५ चे बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. जर तुमचे बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, तर तुम्ही आताच त्याचे नियोजन करून घ्या, जेणेकरून शेवटच्या क्षणी धावपळ होणार नाही. जूनमध्ये एकूण १२ दिवस बँकांना सुट्ट्या असणार आहेत, ज्यात काही प्रादेशिक सण आणि साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश आहे.

या दिवशी बँका असतील बंद
जून महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये बकरी ईदसारख्या महत्त्वाच्या सणासोबतच प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी तसेच सर्व रविवारी बँका बंद राहतात. आरबीआयचे हे कॅलेंडर राज्यानुसार बदलू शकते, त्यामुळे तुमच्या स्थानिक शाखेकडून सुट्ट्यांची यादी एकदा तपासून घेणे चांगले राहील.

जून २०२५ मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी

  • १ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
  • ६ जून (शुक्रवार): ईद-उल-अधा (बकरीद) - केरळमधील कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद.
  • ७ जून (शनिवार): बकरी ईद (ईद-उल-जुहा) - देशभरातील बँका बंद.
  • ८ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
  • ११ जून (बुधवार): संत गुरु कबीर जयंती/सागा दावा - सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशात बँका बंद.
  • १४ जून (शनिवार): दुसरा शनिवार (देशभरात).
  • १५ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
  • २२ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
  • २७ जून (शुक्रवार): रथयात्रा/कांग (रथयात्रा) - ओडिशा आणि मणिपूरमध्ये बँका बंद.
  • २८ जून (शनिवार): चौथा शनिवार (देशभरात).
  • २९ जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी (देशभरात).
  • ३० जून (सोमवार): रेमना नी - मिझोरममध्ये बँका बंद.

लाँग वीकेंडची संधी
या सुट्ट्यांमध्ये ७ जून (शनिवार) रोजी बकरी ईद असल्याने आणि त्यानंतर ८ जून रोजी रविवार असल्याने, हा एक लाँग वीकेंड ठरणार आहे. त्यामुळे या काळात बँकेचे कोणतेही महत्त्वाचे काम करायचे असल्यास ते आधीच करून घ्या.

ऑनलाइन सेवा नेहमीप्रमाणे सुरू
बँकांना सुट्टी असली तरी, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ऑनलाइन आणि मोबाईल बँकिंग सेवा २४x७ उपलब्ध राहतील. तसेच, रोख रकमेच्या गरजेसाठी एटीएम (ATM) केंद्रे नेहमीप्रमाणे कार्यरत असतील. UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आणि इतर पेमेंट ॲप्सही अखंडपणे काम करत राहतील.

वाचा - टाटा समूहाची 'आकाशात' नवी झेप! एअरबससोबत बनवणार हेलिकॉप्टर; 'या' राज्याला मिळणार लाभ

सुट्ट्या कोण ठरवते?
आरबीआय (RBI) 'निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्ट' अंतर्गत बँकांच्या वार्षिक सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर करते. यामध्ये आरबीआय आणि संबंधित राज्य सरकारे मिळून राष्ट्रीय आणि स्थानिक उत्सव, बँकांच्या कामकाजाच्या गरजा, धार्मिक सण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम लक्षात घेऊन सुट्ट्यांची यादी तयार करतात.

Web Title: bank holidays in june 2025 banks in india to closed on thsese 12 days check full list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.