Auto Sweep Service: बहुतांश लोक आपले पैसे सेव्हिंग्ज किंवा करंट अकाउंटमध्ये ठेवतात, ज्यावर बँका फक्त 2.5 ते 3 टक्के इतकेच व्याज देतात. परंतु, थोडी शक्कल लढवली, तर तुम्ही या रकमेवर 7 ते 8 टक्क्यांपर्यंत व्याज मिळवू शकते. म्हणजेच, तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर फिक्स्ड डिपॉझिट (FD) सारखे व्याज मिळेल. हे वाढीव व्याज बँकेच्या ऑटो स्वीप सर्व्हिस (Auto Sweep Service) सुविधेमुळे मिळू शकते.
काय आहे ऑटो स्वीप सर्व्हिस?
ऑटो स्वीप ही बँकांची एक स्मार्ट योजना आहे, ज्यामध्ये तुमचे सेव्हिंग्ज किंवा करंट अकाउंट थेट एफडीशी लिंक केले जाते. जेव्हा तुमच्या खात्यातील रक्कम ठरवलेल्या मर्यादेपेक्षा (Sweep Limit) जास्त होते, तेव्हा ती जादा रक्कम आपोआप एफडीमध्ये रुपांतरित केली जाते.
उदाहरणार्थ
तुम्ही स्वीप लिमिट ₹50,000 निश्चित केली आहे आणि खात्यात ₹80,000 जमा आहेत. तर, या मर्यादेपेक्षा जास्त असलेली ₹30,000 रक्कम आपोआप फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकली जाईल. यावर तुम्हाला 7-8% पर्यंत व्याज मिळेल. म्हणजेच, तुम्हाला सेव्हिंग्ज अकाउंटपेक्षा दुप्पट-तिप्पट व्याज मिळू शकते.
लिक्विडिटी कायम, व्याज जास्त
या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “Swept-In” सुविधा. जर तुमच्या खात्यातील बॅलन्स कमी झाले किंवा तातडीने पैशांची गरज भासली, तर तुम्ही एफडीमधील रक्कम परत खात्यात ट्रान्सफर करू शकता. म्हणजेच तुमचे पैसे लिक्विड राहतात, तरीही तुम्हाला एफडीसारखे व्याज मिळते.
ऑटो स्वीप सर्व्हिसचे फायदे
स्वतंत्रपणे एफडी सुरू करण्याची गरज नाही; प्रक्रिया ऑटोमॅटिक आहे.
गुंतवणुकीसाठी वेगळा वेळ किंवा प्रयत्न लागणार नाही.
कधीही पैसे काढता येतात, पारंपरिक एफडीप्रमाणे ‘मॅच्युरिटी’ची वाट पाहावी लागत नाही.
ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही माध्यमातून सुविधा उपलब्ध.
आर्थिक नियोजनात सेफ्टी आणि लवचिकता दोन्ही मिळते.
सर्व्हिस कशी सुरू करावी?
ऑफलाइन पद्धत:
आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन ‘Auto Sweep Facility’ सुरू करण्याची विनंती करा.
ऑनलाइन पद्धत:
बँकेच्या वेबसाइट किंवा मोबाइल बँकिंग अॅपमध्ये लॉग-इन करा.
“Fixed Deposit” किंवा “More Options” विभागात जा.
“Auto Sweep Facility” निवडा.
स्वीप लिमिट (उदा. ₹50,000 किंवा ₹1 लाख) ठरवा आणि “Submit” वर क्लिक करा.
