The atmosphere of mistrust in the industry is worrying, fear expressed by Vice Chairman of the Policy Commission | उद्योग विश्वातील अविश्वासाचे वातावरण चिंताजनक, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली भीती
उद्योग विश्वातील अविश्वासाचे वातावरण चिंताजनक, नीती आयोगाच्या उपाध्यक्षांनी व्यक्त केली भीती

नवी दिल्ली: गेल्या ७० वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये इतका अविश्वास कधीच नव्हता जितका आज दिसून येत असल्याचे वक्तव्य नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.  त्याचप्रमाणे हीच परिस्थिती कायम राहू नये यासाठी केंद्र सरकारला तातडीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचे देखील  त्यांनी स्पष्ट केले आहे.

राजीव कुमार यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमुळे कोणीच कोणावर विश्वास ठेवण्यास तयार होत नाही. तसेच खासगी क्षेत्रात कोणीच कर्ज देण्यास तयार नाही. त्याचप्रमाणे सार्वजनिक क्षेत्रात देखील हिच अवस्था दिसून येते. त्यामुळे या संकटावर  मात करण्यासाठी सरकारने तातडीने पाऊल उचलण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

तसेच अर्थव्यवस्था अडचणीत सापडण्याचे कारण नोटबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय घेतल्यामुळे झाली आहे. पूर्वी सुमारे ३५ टक्के रोखी उपलब्ध होती, आता मात्र यात बरीच घट झालेली दिसत आहे. यामुळे परिस्थिती अत्यंत अवघड बनली असल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले.  

त्याचप्रमाणे २००९ पासून ते २०१४ पर्यंत कोणताही मागचा पुढचा विचार न करता कर्जवाटप करण्यात आले. यामुळे सन २०१४ नंतर एनपीएमध्ये ( नॉन परफॉर्मिंग अॅसेट) वाढ झाली. या कारणामुळे बँकांची नवे कर्ज देण्याची क्षमता कमी झाली, असेही राजीव कुमार म्हणाले. बँकांनी कमी कर्ज देण्याची भरपाई एनबीएफसीने केली आहे. एनबीएफसीच्या कर्जात २५ टक्के वाढ झाल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: The atmosphere of mistrust in the industry is worrying, fear expressed by Vice Chairman of the Policy Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.