Amazon's Great Indian Festival from September 29th | अ‍ॅमेझॉनचे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २९ सप्टेंबरपासून
अ‍ॅमेझॉनचे ग्रेट इंडियन फेस्टिव्हल २९ सप्टेंबरपासून

नवी दिल्ली : दसरा-दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी अ‍ॅमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हलची घोषणा केली आहे. त्यामुळे २९ सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर या काळात भरघोस खरेदीची संधी ग्राहकांना मिळेल. बहुसंख्य आकर्षक उत्पादने, शिवाय स्वस्त दरात ग्राहकांना खरेदी करता येतील. एसबीआयसह अनेक क्रेडिट कार्डवर मिळणारी आकर्षक सूट, तत्काळ कॅशबॅक, ईएमआयमुळे ग्राहकांची मोठी बचत होईल, असे अ‍ॅमेझॉन इंडियाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी (कॅटेगरी मॅनेजमेंट) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ग्राहकांनी खरेदी केलेली सरासरी ४० टक्के उत्पादने त्यांना एका दिवसात (२४ तासांत) मिळतील, अशी ग्वाही तिवारी यांनी दिली. स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरे, टीव्ही, गृह वापराची उत्पादने, फॅशनपासून ते सौंदर्यप्रसाधनांपर्यंत सर्व वस्तूंवर आकर्षक सूट अ‍ॅमेझॉन देणार आहे. लाखो विक्रेत्यांना एक मोठी बाजारपेठ अ‍ॅमेझॉनमुळे खुली झाली आहे, असे सांगून सेलर सर्व्हिसचे उपाध्यक्ष गोपाल पिल्लई म्हणाले की, आमच्याशी ५ लाख विक्रेते जोडले
गेले आहेत. त्यात मोठ्या ब्रॅँडपासून
ते छोट्या उद्योजकांचाही समावेश आहे.
केवळ मोठी, नामांकित उत्पादने नव्हे, तर अगदी छोट्या-मोठ्या कारागिरांची उत्पादनेही इथे उपलब्ध असणार आहेत. आदिवासी भागातील कलाकारांच्या कलावस्तू, सुबक कारागिरी, गुजराथी मिरर वर्क, आसामी बाबंूपासूनच्या वस्तू, तंजावर शैलीतील चित्रे, बस्तर, मयूरभंजमधील आदिवासी बांधवांच्या वस्तूंनाही अ‍ॅमेझॉनवर मागणी आहे, असे पिल्लई म्हणाले.
अ‍ॅमेझॉनची फेस्टिव्ह यात्राही या काळात प्रमुख शहरांमध्ये काढण्यात येईल. ‘चाकांवरील घर’ अशी अभिनव संकल्पना यात्रेची आहे. त्याद्वारे ग्राहक व विक्रेत्यांना ‘अ‍ॅमेझॉन होम’ अनुभवता येईल. दिल्लीहून सुरू होणारी यात्रा लखनौ, अहमदाबाद व हैदराबादमार्गे बंगळुरूत संपेल. आग्रा, चेन्नई, इंदोर, कोलकाता, कोची, मथुरा, मुंबई व विशाखापट्टणममध्ये ही यात्रा जाईल.
 

English summary :
Amazon Great Indian Festival (Sep 2019) : Amazon has announced the Great Indian Festival from September 19 to October 8. Consumers will have the opportunity to buy in bulk. Amazon India Vice President Manish Tiwari told in a press conference that the attractive discounts,


Web Title: Amazon's Great Indian Festival from September 29th
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.