Lokmat Money > बिझनेस न्यूज > एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

जर तुम्ही एअरटेलचा नंबर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलनं आपल्या युजर्सला सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी जगातील पहिली रिअल टाइम फ्रॉड डिटेक्शन सुविधा आणलीये.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 14:35 IST2025-05-16T14:33:56+5:302025-05-16T14:35:22+5:30

जर तुम्ही एअरटेलचा नंबर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलनं आपल्या युजर्सला सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी जगातील पहिली रिअल टाइम फ्रॉड डिटेक्शन सुविधा आणलीये.

airtel launches defense system for customers ai powered real time fraud detection all apps will be tracked | एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

जर तुम्ही एअरटेलचा नंबर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एअरटेलनं आपल्या युजर्सला सायबर फ्रॉडपासून वाचवण्यासाठी जगातील पहिली रिअल टाइम फ्रॉड डिटेक्शन सुविधा आणलीये, जी प्रत्येक ॲपवर लक्ष ठेवेल आणि कुठेही संशयास्पद पद्धती आढळली तर युजरला सतर्क करेल. एअरटेलनं १५ मे रोजी एक ॲडव्हान्स सोल्यूशन लॉन्च केलं. याद्वारे ईमेल, ब्राउझर, व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक, इन्स्टाग्राम, एसएमएस आणि ऑल ओव्हर-द-टॉप (ओटीटी) ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवलं जाईल. हे सोल्यूशन अशा प्रकारे डिझाइन करण्यात आलंय की ते आपोआप फ्रॉड आणि स्पॅम शोधून काढेल आणि त्यांना ब्लॉकही करेल.

एअरटेलची ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. युजरकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार नाही. सर्व एअरटेल मोबाइल आणि ब्रॉडबँड ग्राहकांसाठी हे सोल्यूशन इंटिग्रेटेड असल्यानं ते आपोआप ॲक्टिव्हेट होईल. अशापरिस्थितीत जर एअरटेल युजर आपल्या मोबाइलवर किंवा इतर कोणत्याही डिव्हाइसवर एखादी वेबसाइट उघडण्याचा प्रयत्न करत असेल, जी मेलेशियस असेल तर एअरटेलचा फ्रॉड डिटेक्शन सोल्यूशन ते पेज ब्लॉक करेल. यासोबतच एअरटेल आपल्या युजरला असं करण्यामागचं कारणही सांगणार आहे.

कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी

वाढताहेत फसवणुकीचे प्रकार

देशभरात डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढत असल्यानं ऑनलाइन फसवणुकीचा धोकाही वाढत आहे. यामुळे युजर्सना मोठा धोका निर्माण झाला आहे. अलीकडच्या काळात अशा घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. ओटीपी फ्रॉड आणि स्कॅमर्सचे कॉल खूप वाढले आहेत. रिपोर्टनुसार, लाखो लोक अशा ऑनलाइन घोटाळ्यांना बळी पडले आहेत. काळाची गरज ओळखून एअरटेलनं एआय पॉवर्ड सोल्यूशन सादर केलं आहे. सध्या ही सेवा हरयाणा सर्कलसाठी सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्यानं ही सेवा संपूर्ण देशात सुरू केली जाईल.

 

Web Title: airtel launches defense system for customers ai powered real time fraud detection all apps will be tracked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Airtelएअरटेल