lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > संपत्तीवाढीमध्ये अदानींनी अंबानींना टाकले मागे

संपत्तीवाढीमध्ये अदानींनी अंबानींना टाकले मागे

राेज ४४९ काेटींची वाढ, बिल गेट्सही पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2020 05:38 AM2020-11-22T05:38:18+5:302020-11-22T05:38:27+5:30

राेज ४४९ काेटींची वाढ, बिल गेट्सही पिछाडीवर

Adani leaves Ambani behind in wealth growth | संपत्तीवाढीमध्ये अदानींनी अंबानींना टाकले मागे

संपत्तीवाढीमध्ये अदानींनी अंबानींना टाकले मागे

नवी दिल्ली : रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या टाॅप टेनमध्येही त्यांचा समावेश हाेताे. मात्र, अदानी समूहाचे गाैतम अदानी यांनी एका बाबतीत अंबानी यांना मागे टाकले आहे. यावर्षी अदानी  यांच्या संपत्तीत अंबानी यांच्यापेक्षा वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी याबाबतीत मायक्राेसाॅफ्टचे बिल गेट्स यांनाही मागे टाकले आहे.

ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ॲमेझाॅनचे जेफ बेझाेस यांचे स्थान कायम आहे. तर मुकेश अंबानी हे दहाव्या स्थानी आहेत. गाैतम अदानी या यादीत ४० व्या स्थानी आहेत. अदानी यांच्याकडे ३० अब्ज डाॅलर्स संपत्ती आहे. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, अदानी यांच्या संपत्ती यावर्षी १९.१ अब्ज डाॅलर्स वाढली आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत यावर्षी १६ अब्ज डाॅलर्स एवढी वाढली.

गौतमअदानी - 30 अब्ज डॉलर

मुकेश अंबानी - 75 अब्ज डॉलर

Web Title: Adani leaves Ambani behind in wealth growth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.