Join us

Animal च्या भरघोस कमाईनंतर रणबीर कपूरने घेतली महागडी कार, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 17:20 IST

रणबीर कपूरची ब्रँड न्यू कार पाहिलीत का?

रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) सध्या प्रचंड मागणी आहे. Animal च्या यशानंतर रणबीरकडे अनेक सिनेमांची रांग लागली आहे. रणबीर कपूरने नुकतीच 8 कोटींची कार विकत घेतली आहे. आपल्या ब्रँड न्यू कारमधून तो घरी दाखल होत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

रणबीर कपूर त्याच्या चार्मिंग लूकमुळे तरुणींमध्ये खूपच लोकप्रिय आहे. त्यातच Animal मधील त्याचा लूक आणि अभिनयाने प्रेक्षकांवर भुरळच घातली आहे. कधीही न दिसलेल्या अशा अवतारात रणबीरने Animal मध्ये काम केलंय. आता तो यापेक्षा अतिशय विरुद्ध भूमिकेत दिसणार आहे. आगामी 'रामायण' सिनेमात तो प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. एकीकडे प्रोफेशनल यश एन्जॉय करत असताना रणबीरने नवीन कार घेतली आहे. जेट ब्लॅक बेंटले कॉन्टिनेन्टल कारमधून येताना तो नुकताच दिसला.

रणबीरकडे याआधीही अनेक लक्झरी कार आहेत. यामध्ये रेंज रोव्हर, मर्सिडीज, ऑडी यांचा समावेश आहे. आता यामध्ये बेंटलेचाही समावेश झाला आहे. रणबीरची एवढी महागडी आणि रॉयल कार पाहून चाहतेही अवाक झालेत. 'अशी कार भारतात कशी काय चालवतो?' अशा मजेशीर कमेंटही एकाने केली आहे.   

टॅग्स :रणबीर कपूरबॉलिवूडकारसोशल मीडिया