Join us
Daily Top 2Weekly Top 5

मी नाही, त्यानं मला सोडलं...! सुशांतच्या मृत्यूनंतर 9 महिन्यांनी अंकिता लोखंडे ब्रेकअपवर बोलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 18:28 IST

2016 मध्ये अंकिता व सुशांतचे ब्रेकअप झाले होते. या ब्रेकअपमागचे कारण कोणालाही ठाऊक नव्हते. पण आता खुद्द अंकिताने या ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासा केला आहे.

ठळक मुद्देअंकिता व सुशांत एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते. एक दोन वर्षे नाही तर सहा वर्षे दोघेही एकमेकांसोबत होते. दोघे लग्न करणार, असे मानले जात असतानाच अचानक दोघांचे ब्रेकअप झाले होते.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. त्याच्या निधनाला आता 9 महिने पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही सुशांत आणि अंकिता लोखंडेचे रिलेशनशिप चर्चेत आहे. 2016 मध्ये अंकिता व सुशांतचे ब्रेकअप झाले होते. पण या ब्रेकअपमागचे कारण कोणालाही ठाऊक नव्हते. पण आता खुद्द अंकिताने या ब्रेकअपमागच्या कारणांचा खुलासा केला आहे.‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता  सुशांतसोबतच्या रिलेशनशिपवर बोलली. आज जो तो मला तू सुशांतला का सोडले? असा प्रश्न करतोय. पण कोणालाच माझी कहाणी माहित नाही, असे ती म्हणाली.

माझी कहाणी कोणालाच माहित नाही...मी इथे कोणावर आरोप करत नाहीये. पण माझी कहाणी कोणालाच ठाऊक नाही. सुशांतला काय हवे होते, हे त्याने पक्के ठरवले होते. त्याला करिअरमध्ये पुढे जायचे होते आणि म्हणून माझ्याऐवजी त्याने करिअर निवडले आणि पुढे गेला. तो तर पुढे निघून गेला. पण  त्यानंतर अडीच वर्षे मी काय काय सहन केले, हे मलाच ठाऊक़ मी बेडवर नुसते पडून असायचे. मी आता काय करू? आत्महत्या करू का? असे प्रश्न सतत डोक्यात सुरु राहायचे. लोक येऊन मला सुशांतसोबतचे फोटो डिलीट करायला, घरातून हटवायला सांगायचे. पण मला वेळ द्या, यातून बाहेर पडण्यासाठी मला थोडा वेळ हवाये, असे मी त्यांना सांगायचे.

तेव्हा तुम्ही कुठे होता?सुशांतच्या मृत्यूनंतर युजर्सनी अंकिताला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केले होते. अंकिताने सोडले नसते तर सुशांत आज जिवंत असता, असे काय काय ट्रोलर्स म्हणाले होते. यावरही अंकिता बोलली. माझे बे्रकअप झाले, तेव्हा हे लोक कुठे होते? तो मला सोडून गेला, तेव्हा तुम्ही का बोलला नाहीत? असा सवाल तिने केला. आज सुशांत आपल्यात नाहीये. त्याच्याबद्दल माझ्या मनात काहीही राग नाही, असेही ती म्हणाली.

मी त्याची वाट वाट बघत होते...मी त्याची खूप वाट पाहिली... पण तो परतला नाही. मी त्याला दोष देत नाहीये. त्याने त्याचा मार्ग निवडला, मग मी काय करायला हवे होते? सुशांत या जगातून गेल्यानंतर मी पब्लिसिटीसाठी त्याच्या कुटुंबाशी जवळीक वाढवली, असा आरोपही लोकांनी केला. पण सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतरही मी त्याच्या कुटुंबाशी नाते टिकवून ठेवले होते आणि आहे. सुशांत आज नाही. पण मी आहे आणि मी त्याच्या कुटुंबाची अशीच काळजी घेत राहील. मला त्यांचा काही अचानक पुळका आलेला नाही, असेही अंकिता म्हणाली.

टॅग्स :अंकिता लोखंडेसुशांत सिंग रजपूत