गणेश पोळटेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण ५५ दिवसांत निम्म्यावर आले आहे. २६ जानेवारी २०२६ रोजी उजनी धरणाचीपाणी पातळी १०० टक्के होती.
गतवर्षीचा तुलनेत धरणात १० टीएमसी जास्तीचे पाणी असल्यामुळे समाधानकारक स्थिती आहे. गेल्यावर्षी मार्चअखेर धरणात उपयुक्त १७ टीएमसी पाणीसाठा होता. सध्या २७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
सध्या उजनीतून उजनी मुख्य कालवा २ हजार ३०० क्युसेक, भीमा-सीना जोड कालव्यातून ९०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून ३१५ क्युसेक, दहिगाव योजनेतून ८५ क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
निवडणुकीच्या धामधुमीमुळे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली नसली तरी उजनीतून भीमा नदीत मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने पुढील दोन महिने मे अखेरपर्यंत तरी सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. रब्बी हंगामासाठी सोडलेले पाणी १ मार्च रोजी बंद करण्यात आले होते.
तर १७ मार्चपासून उन्हाळी हंगामासाठी उजनी मुख्य कालवा व जोड कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. दरवर्षी एप्रिलअखेर मृत साठ्यात जाणारे उजनी, यावर्षी मात्र सोलापूर समांतर जलवहिनीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देणारे ठरणार आहे.
धरणात ५१ टक्के पाणी पातळी◼️ गतवर्षी २५ मार्च २०२५ रोजी ३१ टक्के पाणी पातळी शिल्लक होती तर एकूण ८१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. पैकी १७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.◼️ यावर्षी गतवर्षीपेक्षा १० टीएमसी उपयुक्त जादा पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या २७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. एकूण २१ टीएमसी पाणी उजनी धरणात आहे. ५१ टक्के पाणी पातळी आहे.
भीमा नदीकाठचा सिंचनाचा प्रश्न लागला मार्गी◼️ कर्नाटक जलसंपदा विभागाच्या आडमुठ्या धोरणामुळे उजनीतून भीमा नदीत गेल्या दोन महिन्यांत दोनदा पाणी सोडावे लागले.◼️ कर्नाटक हद्दीत भीमा नदीवर दोन बंधारे असून, त्यानंतर महाराष्ट्र हद्दीत शेवटी दोन बंधारे आहेत.◼️ सुरुवातीला कर्नाटकने पाणी अडवून ठेवल्याने शेवटच्या बंधाऱ्यापर्यंत पाणी पोहोचले नव्हते. त्यामुळे बंद करण्यात आले होते.◼️ कर्नाटक हद्दीतील बंधारे खुले झाल्यानंतर पुन्हा उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले.◼️ सध्या भीमा नदीवरील बंधाऱ्यात पुढील एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा असल्याने नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
अधिक वाचा: रॉकेल वाटपाचा जीआर आला; आता एका रेशन कार्डवर नक्की किती रॉकेल मिळणार? वाचा सविस्तर
Web Summary : Ujani Dam's water level is currently at 51%. Despite withdrawals for irrigation, it holds more water than last year, ensuring water supply for the next two months. Water was released into Bhima river after problems with Karnataka's dams.
Web Summary : उजनी बांध का जल स्तर वर्तमान में 51% है। सिंचाई के लिए निकासी के बावजूद, इसमें पिछले वर्ष की तुलना में अधिक पानी है, जिससे अगले दो महीनों के लिए पानी की आपूर्ति सुनिश्चित होती है। कर्नाटक के बांधों की समस्याओं के बाद भीमा नदी में पानी छोड़ा गया।