Join us

राज्यात एकीकडे पुर तर 'या' जिल्ह्यातील जलस्त्रोत अद्याप तहानलेलेच; बहुतांश धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:39 IST

Water Shortage : राज्यातील विदर्भाच्या वर्धा जिल्ह्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये २७ जूनपर्यंत ३७.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या काळापर्यत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे जास्त टक्के साठा शिल्लक होता. जिल्ह्यातील केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून, उर्वरित सर्व प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमीच जलसाठा आहे.

वर्धा जिल्ह्यातील प्रमुख ११ धरणांमध्ये २७ जूनपर्यंत ३७.९७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या काळापर्यत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे जास्त टक्के साठा शिल्लक होता. जिल्ह्यातील केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून, उर्वरित सर्व प्रकल्पांत ५० टक्क्यांपेक्षा कमीच जलसाठा आहे. सुरुवातीला हलक्या स्वरूपाच्या पावसामुळे जलाशयांची पाणीपातळीही झपाट्याने कमी होत आहे.

पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. जलाशयांसह शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात यावर्षी मान्सून उशिराने दाखल झाला. मात्र, जून महिन्यात म्हणावा तसा बरसलाच नाही. जुलैच्या सुरुवातीलाही पावसाची उघडझाप सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीसह धरणांतील साठाही कोरडा पडत चालला आहे.

सध्या जिल्ह्यातील सर्व जलाशयांमध्ये ४०.४५ टक्के जलसाठा शिल्क असून, वर्धा जिल्ह्यात पाणीपुरवठा करणाऱ्या धाम प्रकल्पात ३१.२३ टक्के जलसाठा आहे. मागील काही दिवसांपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. परिणामी, उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामानाचा परिणाम पिकांवर होत आहे. बियाणे अंकुरून खराब होत चालले आहेत.

जिल्ह्यात धरणे सरासरी भरली ४० टक्के

यावर्षी २ जुलैपर्यंत प्रमुख ११ धरणे सरासरी ३७ टक्के भरली. केवळ निम्नवर्धा प्रकल्प ५०.४४ टक्के भरला असून, उर्वरित सर्वच १० प्रकल्प ५० टक्क्यांपेक्षाही खाली भरले आहेत.

जलसाठ्यांची टक्केवारी

निम्नवर्धा प्रकल्प - ५०.४४% लाल नाला प्रकल्प - ४५.९८ %बोर प्रकल्प - ३७.९६ %धाम प्रकल्प - ३१.२३ %पंचधारा प्रकल्प - २५.३७ %डोंगरगाव प्रकल्प - १९.५९ %सुकळी लघु प्रकल्प - १४.७० %मदन प्रकल्प - १३.१६ %मदन उन्नई प्रकल्प - ५.९६ %पोथरा प्रकल्प - २.५९ %

आजपर्यंत पडलेला पाऊस (मिमी)

आर्वी - १.६ कारंजा - ४.० आष्टी - २.६ वर्धा - १.२ सेलू - ४.१ देवळी - १.८ हिंगणघाट - ५.६ समुद्रपूर - १२.६ 

हेही वाचा : रेशीम शेती प्रयोगातून चमकले नशीब; संजय नाईकवाडे यांनी निर्माण केला शेतकऱ्यांपूढे आदर्श

टॅग्स :विदर्भपाणीकपातशेती क्षेत्रशेतीपाणीपाऊसनदीधरण