Lokmat Agro >हवामान > ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? कोणत्या आठवड्यात जास्त पाऊस?

ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? कोणत्या आठवड्यात जास्त पाऊस?

What will be the rainfall forecast for the month of August? Which week will see the most rainfall? | ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? कोणत्या आठवड्यात जास्त पाऊस?

ऑगस्ट महिन्यात कसा राहील पावसाचा अंदाज? कोणत्या आठवड्यात जास्त पाऊस?

Maharashtra Rain Update गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस मोठ्या सुटीवर जाणार आहे.

Maharashtra Rain Update गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस मोठ्या सुटीवर जाणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मुंबई : गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस मोठ्या सुटीवर जाणार आहे.

वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदलामुळे मोठा पाऊस १५ ऑगस्टनंतरच बरसू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी सोमवारी वर्तवला. कोकणासह राज्यभरातही आगामी १५ दिवसांतील पावसाची स्थिती साधारणतः अशीच असू शकते.

श्रावण महिना सुरू झाला आणि मुंबईत आषाढासारखा पाऊस कोसळू लागला. पहिले दोन दिवस थांबून थांबून का होईना पाऊस राज्याला झोडपत होता.

ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा पडणारा पाऊस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पडतो, असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी सांगितले.

आता आठवडाभर ऊन-पावसाचा खेळ
येत्या रविवारपर्यंत मुंबईत श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ रंगेल. अधूनमधून श्रावणसरी येतील आणि लुप्त होती. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत हलका, तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज म्हणतो. मोठा पाऊस या काळात कोसळण्याची शक्यता नाही, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज म्हणतो.

अधिक वाचा: Ranbhajya : जीवनसत्वाचा खजिना असणाऱ्या 'या' रानभाज्या खा अन् आजारापासून दूर रहा

Web Title: What will be the rainfall forecast for the month of August? Which week will see the most rainfall?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.