Join us
Daily Top 2Weekly Top 5

हवामानात बदल होणार; राज्यातील 'या' भागात थंडी कमी होऊन पाऊस पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 15:19 IST

दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी उद्यापासून (बुधवार) कमी होणार आहे. त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे.

मुंबई : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थोडी लवकरच आलेली थंडी उद्यापासून (बुधवार) कमी होणार आहे. त्याऐवजी आता हवामानात होणाऱ्या बदलामुळे २२ नोव्हेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईच्या किमान तापमानाचा पाराही १८ वरून २२ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदविण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतला गारवाही गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कमी होण्याचा अंदाज आहे.

हिमालयात झालेली बर्फवृष्टी, उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारे थंड वारे; या कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यभरातील किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्रात तर जळगावसह लगतच्या जिल्ह्यांत किमान तापमान ९ अंश सेल्सिअसवर येऊन ठेपले होते. तर मुंबईचा पाराही १८ पर्यंत घसरला होता.

हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिमालयातून म्हणजे उत्तर भारतातून दक्षिणेकडे वाहणारे वारे थांबणार आहेत. त्याऐवजी दक्षिण-पूर्वेकडून वारे वाहण्यास सुरुवात होईल.

हवामान बदलाचा फटका◼️ उत्तर-पूर्व मान्सूनचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे.◼️ या बदलामुळे हवामानातील ओलावा वाढेल, ढग येतील.◼️ परिणामी, नोव्हेंबरच्या उत्तरार्धात महामुंबई वगळून राज्यात पावसाची शक्यता आहे.

कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअ)जेऊर ८अहिल्यानगर ९.५नाशिक ९.६जळगाव ९.८मालेगाव १०सातारा ११.९नंदुरबार १२.१छत्रपती संभाजीनगर १२.४महाबळेश्वर १३.२डहाणू १६.५पालघर १५.९मुंबई १८.९ठाणे २१

अधिक वाचा: पीएम किसान योजेनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Shift: Cold Recedes, Rain Expected Soon

Web Summary : Maharashtra's weather is changing. The cold will decrease from Wednesday, with light rain expected in parts of the state after November 22. Mumbai's temperature will rise. This is due to changes in wind direction and the potential impact of the North-East monsoon.
टॅग्स :हवामान अंदाजमहाराष्ट्रपाऊसविदर्भमराठवाडाजळगाव