संपूर्ण राज्यात आज, ३० मार्चपासून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
३० मार्च रोजी प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल होऊ शकतो. ३० मार्चच्या तुलनेत ३१ मार्च रोजी वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.
मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर १ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. अशा वेळी झाडाखाली, विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
३०, ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहू शकतात. दक्षिण कोकणात मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान, शास्त्रज्ञ
२९ आणि ३० मार्च रोजी महामुंबईतवरही ढग दाटून येतील. मुंबईसह लगत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर राज्यभरात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात दुपारसह संध्याकाळी या काळात गारपिटीचीही शक्यता आहे. - अश्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक
अधिक वाचा: जमिनीची तोंडी वाटणी व पोट हिश्याचे वाद आता मिटणार; सातबारा व नकाशावर होणार 'हे' बदल
Web Summary : Maharashtra faces unstable weather from today, March 30th. Expect thunderstorms, lightning, and hailstorms in Khandesh, Marathwada, and Vidarbha. While intensity reduces on March 31st, unstable conditions persist. Increased rainfall is predicted from April 1st-4th. Farmers are advised to seek shelter during storms.
Web Summary : महाराष्ट्र में आज, 30 मार्च से अस्थिर मौसम का सामना करना पड़ेगा। खानदेश, मराठवाड़ा और विदर्भ में गरज, बिजली और ओलावृष्टि की आशंका है। 31 मार्च को तीव्रता कम होने पर भी अस्थिर स्थिति बनी रहेगी। 1-4 अप्रैल से बारिश बढ़ने का अनुमान है। किसानों को तूफान के दौरान आश्रय लेने की सलाह दी जाती है।