Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Weather Update: या जिल्ह्यात पावसाचा जोर.. पुढील काही दिवसांत मुसळधारचा अंदाज

Weather Update: या जिल्ह्यात पावसाचा जोर.. पुढील काही दिवसांत मुसळधारचा अंदाज

Weather Update: Heavy rain in this district.. Heavy rain forecast in next few days | Weather Update: या जिल्ह्यात पावसाचा जोर.. पुढील काही दिवसांत मुसळधारचा अंदाज

Weather Update: या जिल्ह्यात पावसाचा जोर.. पुढील काही दिवसांत मुसळधारचा अंदाज

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर आला आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दुपारपासून जोर धरला आहे. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस झाला. शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर आला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

७ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला होता. सर्वच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. शेकडो घरांची पडझड होऊन सुमारे ४ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. एक वृद्ध व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. त्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली होती. बऱ्याच ठिकाणी ऊन पडले होते.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमाराला पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. एकावर एक अशा मुसळधार पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे शेतीच्य कामांना पुन्हा एकदा गती प्राप्त झाल आहे.

पाऊस नव्हता त्या काळान पाण्याअभावी लावणीची कामे थांबल होते. तीन ते चार दिवसानंतर पुन्ह जोरदार पाऊस झाल्याने लावणीच्या कामांना वेग आला आहे. शेतकरी शेतीच्या कामात गुंतलेला आहे.

पावसाची आकडेवारी
सिंधुदुर्गमध्ये गेल्या २४ तासात म्हणजेच शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे देवगड ११.५, मिमी, मालवण १९.३ मिमी, सावंतवाडी १५.३ मिमी, वेंगुर्ला ६.६ मिमी, कणकवली १४.९ मिमी, कुडाळ १२.८ मिमी, वैभववाडी २०.१ मिमी, दोडामार्ग १० मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

Web Title: Weather Update: Heavy rain in this district.. Heavy rain forecast in next few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.