Lokmat Agro >हवामान > हवामान स्थिर होण्यास सुरुवात; मान्सून 'या' तारखेला राज्यातून निरोप घेण्याची शक्यता

हवामान स्थिर होण्यास सुरुवात; मान्सून 'या' तारखेला राज्यातून निरोप घेण्याची शक्यता

Weather starts to stabilize; Monsoon likely to depart from the state on 'this' date | हवामान स्थिर होण्यास सुरुवात; मान्सून 'या' तारखेला राज्यातून निरोप घेण्याची शक्यता

हवामान स्थिर होण्यास सुरुवात; मान्सून 'या' तारखेला राज्यातून निरोप घेण्याची शक्यता

Return Monsoon Maharashtra यंदा मॉन्सून समाधानकारक कोसळल्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

Return Monsoon Maharashtra यंदा मॉन्सून समाधानकारक कोसळल्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली.

शेअर :

Join us
Join usNext

यंदा मान्सून समाधानकारक कोसळल्याने सलग दुसऱ्या वर्षी राज्यात २० टक्के अधिक पावसाची नोंद झाली. गतवर्षी राज्यात १,२५२.१ मिलिमीटर म्हणजेच २६ टक्के अधिक पाऊस झाला होता. यंदा चारही महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे.

राज्यातील बहुतांश भागात २९ सप्टेंबर २०२५ पासून हवामान स्थिर आहे. मात्र २ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विदर्भ, मराठवाडा, आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने मेघगर्जनेसह राहील आणि दुपारनंतर पडेल.

वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता विदर्भात राहील. काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

राज्यात ७ ऑक्टोबर २०२५ पासून हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल, आणि सुमारे ८ ऑक्टोबर २०२५ पासून मान्सून राज्यातून निरोप घेईल. त्यानंतर पुढच्या काही दिवसातच संपूर्ण राज्यातून मान्सून निरोप घेईल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अधिक वाचा: यंदाची ऊस गाळप हंगाम आढावा बैठक झाली; गाळप कधी सुरु होणार? उसाला किती दर देणार?

Web Title : मौसम स्थिर होने लगा; मानसून 8 अक्टूबर तक महाराष्ट्र से विदा होने की संभावना

Web Summary : बारिश के बाद महाराष्ट्र का मौसम स्थिर हो रहा है। 7 अक्टूबर, 2025 तक विदर्भ, मराठवाड़ा और मध्य महाराष्ट्र में छिटपुट बारिश की उम्मीद है। मानसून लगभग 8 अक्टूबर, 2025 से पीछे हटने की संभावना है, जिसके तुरंत बाद पूरी तरह से वापसी हो जाएगी। किसानों को काटी गई फसलों को बचाने की सलाह दी जाती है।

Web Title : Weather Stabilizing; Monsoon Likely to Retreat from Maharashtra by October 8

Web Summary : After abundant rainfall, Maharashtra's weather is stabilizing. Scattered showers expected in Vidarbha, Marathwada, and central Maharashtra until October 7, 2025. Monsoon retreat likely begins around October 8, 2025, with complete withdrawal soon after. Farmers advised to protect harvested crops.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.