Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > वीर धरणातील पाणीसाठा आता स्थिर; सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद

वीर धरणातील पाणीसाठा आता स्थिर; सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद

Water storage in Veer Dam is now stable; discharge through sewage completely stopped | वीर धरणातील पाणीसाठा आता स्थिर; सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद

वीर धरणातील पाणीसाठा आता स्थिर; सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद

Veer Dam Water Storage : वीर धरण परिसरात सुरू असलेला पाऊस थांबला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, विद्युतगृहातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आता ६८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे.

वीर धरण परिसरात सुरू असलेला पाऊस थांबला आहे. यामुळे धरणातून पाण्याचा सांडव्याद्वारे होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून, विद्युतगृहातून १४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणातील पाणीसाठा आता ६८ टक्क्यांवर स्थिर झाला आहे.

गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे वीर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली होती, ज्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, पाऊस थांबल्याने धरणात नवीन पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. यामुळे पाटबंधारे विभागाने पाणी सोडणे थांबवले असून, धरणाची पाणीपातळी सध्या आहे त्याच स्तरावर कायम आहे.

सध्या तरी धरणाच्या पाणीसाठ्यात कोणतीही वाढ अपेक्षित नाही; कारण पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे; कारण पाण्याचा धोका टळला आहे. पुढील काळात पावसाची स्थिती पाहून धरणाच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घेतले जातील, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : जांभूळ शेतीतून लाखोंची लॉटरी; दलदलमय जमिनीवर दत्तात्रय यांचा बहाडोली जांभूळ शेतीचा यशस्वी प्रयोग

Web Title: Water storage in Veer Dam is now stable; discharge through sewage completely stopped