Join us

उजनी धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ; आजमितीला धरणात किती पाणीसाठा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 11:35 IST

Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत असून सोमवार, ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ३० ते ४६ टक्के झाली.

टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाचीपाणी पातळी संथ गतीने वाढत असून सोमवार, ५ जून रोजी सायंकाळी ६ वाजता ३० ते ४६ टक्के झाली.

दौंड येथील विसर्ग कायम असून ५,५९७ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. दररोज १ टक्क्याने पाणी पातळी वाढत असून, बुधवारी सकाळी २९.८३ टक्के पाणी पातळी होती.

उजनी धरणात सध्या ८० टीएमसी पाणीसाठा झाला असून १६.३२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या १८ मे पासून उजनी धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत असून सध्या उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद आहे.

यावर्षी देखील उजनी पाणलोट क्षेत्रात पावसाची चांगली सुरुवात झाली असून १ जून रोजी ५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

गतवर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने ४ जूनपासून पाणी पातळी स्थिर राहिली होती, तर ९ जूनपासून पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती.

गतवर्षी ६ जून २०२४ रोजी ३१.५४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता तर धरणाची पाणी पातळी वजा ५९.९६ टक्केपर्यंत खाली गेली होती.

अधिक वाचा: राज्यात १९७ कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण योजना रद्द; सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांना?

टॅग्स :उजनी धरणधरणपाणीसोलापूरपाऊसपाटबंधारे प्रकल्प