Lokmat Agro >हवामान > Vidarbha Monsoon Update : दोन दशकांचा विक्रम मोडीत; गडचिरोलीमार्गे विदर्भात मान्सून दाखल वाचा सविस्तर

Vidarbha Monsoon Update : दोन दशकांचा विक्रम मोडीत; गडचिरोलीमार्गे विदर्भात मान्सून दाखल वाचा सविस्तर

Vidarbha Monsoon Update: Breaking a two-decade record; Monsoon enters Vidarbha via Gadchiroli | Vidarbha Monsoon Update : दोन दशकांचा विक्रम मोडीत; गडचिरोलीमार्गे विदर्भात मान्सून दाखल वाचा सविस्तर

Vidarbha Monsoon Update : दोन दशकांचा विक्रम मोडीत; गडचिरोलीमार्गे विदर्भात मान्सून दाखल वाचा सविस्तर

Vidarbha Monsoon Update : गेल्या दोन दशकांतील विक्रम मोडीत काढत यंदा मान्सूनने मे महिन्यातच विदर्भात दमदार एंट्री घेतली आहे. गडचिरोलीमार्गे आलेल्या या पावसाच्या लाटेने अकोल्यात सव्वाशे वर्षांचा विक्रम मोडला, तर नागपूर, अमरावतीतही मुसळधार पावसाची नोंद झाली. (Vidarbha Monsoon Update)

Vidarbha Monsoon Update : गेल्या दोन दशकांतील विक्रम मोडीत काढत यंदा मान्सूनने मे महिन्यातच विदर्भात दमदार एंट्री घेतली आहे. गडचिरोलीमार्गे आलेल्या या पावसाच्या लाटेने अकोल्यात सव्वाशे वर्षांचा विक्रम मोडला, तर नागपूर, अमरावतीतही मुसळधार पावसाची नोंद झाली. (Vidarbha Monsoon Update)

शेअर :

Join us
Join usNext

Vidarbha Monsoon Update : अंदमान, केरळमार्गे झपाट्याने प्रगती करत असलेला मान्सून यंदा विदर्भात वेळेपेक्षा बऱ्याच आधी दाखल झाला आहे. बुधवारी (२८ मे) गडचिरोली जिल्ह्यातून मान्सूनने विदर्भात अधिकृतपणे प्रवेश केला.(Vidarbha Monsoon Update)

यामुळे केवळ दोन दशकातील नव्हे, तर तब्बल ६३ वर्षांनंतर पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सूनने विदर्भात धडक दिल्याचा इतिहास रचला आहे. गेल्या सहा दशकांतील विक्रम मोडीत काढत यंदा मान्सूनने मे महिन्यातच विदर्भात दमदार एंट्री घेतली आहे.(Vidarbha Monsoon Update)

गडचिरोलीमार्गे आलेल्या या पावसाच्या लाटेने अकोल्यात सव्वाशे वर्षांचा विक्रम मोडला, तर नागपूर, अमरावतीतही मुसळधार पावसाची नोंद झाली. मान्सूनने यंदा अपूर्वच इतिहास रचला आहे.(Vidarbha Monsoon Update)

दक्षिण भारतातून सुरू झालेला पावसाचा प्रवास आता विदर्भात दाखल झाला असून, गडचिरोली जिल्ह्याच्या माध्यमातून बुधवारी (२८ मे) मान्सूनने विदर्भात अधिकृतपणे प्रवेश केला. हवामान विभागाने याची माहिती देताना सांगितले की, गेल्या ६३ वर्षांतील सर्वात लवकर मान्सून विदर्भात दाखल झाला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच असा मे महिन्यात मान्सून!

हवामान विभागाचे अधिकारी सिकंदर जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सून विदर्भात पोहोचला आहे. सर्वसामान्यतः बंगालच्या उपसागरातून विदर्भात येणारा मान्सून साधारणतः १६ जूनच्या आसपास पोहोचतो. मात्र यंदा पावसाने वेग घेतला असून, महाराष्ट्रात सर्वात आधी विदर्भात धडक दिली आहे.

अकोल्यात सव्वाशे वर्षांचा विक्रम मोडला!

मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत अकोल्यात तब्बल १४०.७ मिमी पावसाची नोंद झाली. ही मे महिन्यातील आतापर्यंतची सर्वाधिक नोंद आहे. १८९३ साली झालेल्या १०४.१ मिमी पावसाचा विक्रम यामुळे मोडीत निघाला. याशिवाय, २४ तासांत झालेल्या पावसाच्या विक्रमातही अकोल्याने १९४३ चा ४४.७ मिमीचा विक्रम मागे टाकला.

दोन दशकांचा पॅटर्न मोडीत

सामान्यतः मान्सून विदर्भात १६ जूनच्या आसपास दाखल होतो. मागील २० वर्षांतील नोंदी पाहता, मान्सून ८ जून (२०१८) ही सर्वात लवकर आलेली तारीख होती. मात्र यंदा तो २५ मे रोजीच महाराष्ट्रात पोहोचला, आणि २८ मे रोजी गडचिरोलीतून विदर्भात प्रवेश केला. त्यामुळे या दोन्ही पातळ्यांवर रेकॉर्ड मोडले गेले आहेत.

वर्षतारीख
२०२५२८ मे
२०२४२४ जून
२०२३२५ जून
२०२२१६ जून
२०२१९ जून
२०२०१२ जून
२०१९२२ जून
२०१८८ जून
२०१७१६ जून
२०१६१८ जून
२०१५१३ जून
२०१४१९ जून
२०१३९ जून
२०१२१७ जून
२०१११५ जून
२०१०१४ जून
२००९२६ जून
२००८११ जून
२००७१८ जून
२००६२१ जून
२००५२४ जून

विशेष म्हणजे यापूर्वी १९६२ साली मे महिन्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता, आणि त्यावर्षीही तो विदर्भात मे महिन्यात पोहोचल्याची नोंद आहे, असे हवामान तज्ज्ञ सिकंदर जामदार यांनी स्पष्ट केले.

नागपूर, अमरावतीही भिजले!

* अमरावतीत बुधवारी सकाळपर्यंत ४५.२ मिमी पावसाची नोंद.

*  नागपूरमध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस.

* अनेक भागांत झाडे उन्मळली, विजपुरवठा खंडित.

कृषी क्षेत्रासाठी संधी आणि आव्हाने

* मे महिन्यात पावसाचा प्रारंभ झाल्याने खरीप हंगामाच्या तयारीला गती मिळणार असली तरी, शेतकरी साशंक आहेत. कारण वेळेआधी आलेला पाऊस व नंतरचा खंड हे अनेकदा उत्पन्नावर परिणाम करतात. त्यामुळे शाश्वतीसाठी पुढील पावसाचे स्वरूप महत्त्वाचे ठरणार आहे.

* मान्सूनचा हा प्रवास खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरू शकतो. मात्र, वेळेआधी आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पूर्वतयारी न झाल्याने अडचणी देखील वाढल्या आहेत.

मागील दोन दशकात तो २०१८ साली ८ जूनला, म्हणजे आठवडाभरापूर्वी दाखल झाला होता. याशिवाय २०२१ ला ९ जून, २०१३ व २०१५ मध्ये १३ जून, २०१० मध्ये १४ जून व २००८ साली मान्सूनचे ११ जून रोजी आगमन झाले होते. या दोन दशकात तो मे महिन्यात कधीच विदर्भात प्रवेशला नाही. - रिझवान अहमद, हवामान वैज्ञानिक, प्रादेशिक हवामान विभाग, नागपूर

हे ही वाचा सविस्तर : Vidarbha Monsoon Update: शेतकऱ्यांनो, आता पेरणी म्हणजे उलटणीची शक्यता! जाणून घ्या काय आहे कारण

Web Title: Vidarbha Monsoon Update: Breaking a two-decade record; Monsoon enters Vidarbha via Gadchiroli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.