टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरणाची उपयुक्त पाणीसाठा १६ टीएमसी राहिली असून उन्हाळी पिकांसाठी विविध योजनांतून उजनी धरणातून दररोज एकूण ४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे.
सध्या उजनी धरणाची पाणीपातळी २९.६७ टक्के राहिला आहे. गेल्या ६ मार्चपासून उजनी धरणातून उन्हाळी हंगाम पाणीपाळी सुरू आहे.
उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ८५० क्युसेक, भीमा सीना जोडकालव्यातून ८७५ क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन ३३३ क्युसेक, दहिगाव योजना ६० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
साधारण एप्रिल महिन्याचा अखेरीस उजनी धरण मृतसाठ्यात जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात एकूण ७९.५५ टीएमसी पाणीसाठा असून ६३. ६६ टीएमसी मृतसाठा धरला जातो.
उजनी धरण मृतसाठ्यात गेल्यानंतर सीना माढा व दहिगाव सिंचन योजना बंद करण्यात येतात. उजनी जलवाहिनीतून दररोज ११० एमएलडी पाणी मिळते. टाकळी ते सोरेगाव योजनेतून ९० एमएलडी पाणी मिळते. तसेच हिप्परगा तलावातूनही पाणी मिळते.
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर