Join us

Ujani Dam Water Level : उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडले; १० हजार क्युसेकने विसर्ग सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:49 IST

Ujani Dam Water भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने विसर्ग सुरु केला आहे.

टेंभुर्णी : भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे बंडगार्डन व दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. उजनी धरणाचीपाणी पातळी वाढत असल्याने सकाळी १० वाजता धरणाचे १६ दरवाजे उघडून १० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत सोडण्यात आला आहे.

दौंड येथून उजनी धरणात २० हजार ८४९ क्युसेक धरणात मिसळत आहे. बंडगार्डन येथून १९ हजार ७१९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. २ जुलै रोजी उजनीतून भीमा नदीतील विसर्ग कमी करण्यात आला होता.

उजनी पाणलोट क्षेत्र असलेल्या भीमा खोऱ्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ९० टक्के पाणी पातळी झाली होती.

उजनीची क्षमता पाहता उजनीतून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणात १११.४२ टीएमसी पाणीसाठा असून ४७.७७ उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. उजनीची क्षमता १२३ टीएमसी असून ११७ टीएमसीला शंभर टक्के भरले जाते.

वीज निर्मिती केंद्रातून १ हजार ६०० क्युसेक, उजनी मुख्य कालव्यातून १ हजार ९०० क्युसेक, भीमा सीना जोड कालव्यातून ८०० क्युसेक, सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून १८० क्युसेक, दहिगाव ८० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.

९ जुलैला गतवर्षी मृत साठ्यात, यंदा ९० टक्के◼️ गतवर्षी उजनी धरणाची पाणी पातळी मृत साठ्यात वजा ३७ टक्के होती.◼️ यंदा मात्र उजनी भीमा नदीत पाणी सोडले नसते तर जूनअखेर उजनी शंभर टक्के भरले असते.◼️ गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक स्थिती आहे.◼️ धरणातून पाणी सोडल्यामुळे निरा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, नदी दुथडी भरून वाहत आहे.◼️ यामुळे परिसरातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे, असेही स्थानिकांनी सांगितले.

अधिक वाचा: Tukdebandi Kayda : शेतजमीन तुकडेबंदी कायदा रद्द होण्याची शक्यता; काय होईल निर्णय? वाचा सविस्तर

टॅग्स :उजनी धरणपाणीशेतकरीशेतीसोलापूरधरणनदी