Join us

Ujani Dam Update : भीमा खोऱ्यातील सर्व धरणे भरली; उजनीची पाणी साठवण क्षमता पूर्ण झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 13:46 IST

गेल्या मंगळवारपासून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आला आहे. उजनीच्या १६ दरवाजांतून १५ हजार क्युसेक विसर्ग सध्या सोडण्यात येत आहे.

गेल्या मंगळवारपासून उजनीतून भीमा नदीत सोडण्यात येत असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात घटवण्यात आला आहे. उजनीच्या १६ दरवाजांतून १५ हजार क्युसेक विसर्ग सध्या सोडण्यात येत आहे.

वीज निर्मिती १ हजार ६०० असा १६ हजार ६०० क्युसेक विसर्ग भीमा नदीपात्रात सुरू आहे. तर भीमा पाणलोट क्षेत्रातील पाऊस थांबल्याने दौंड येथील विसर्गातदेखील मोठी घट झाली आहे.

दौंड येथून १९ हजार क्युसेक विसर्ग धरणात मिसळत आहे. भीमा खोऱ्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरली असल्याने उजनीवरील धरणातील पाणी थेट उजनीत मिसळत आहे. उजनीची पाणी साठवण क्षमता पूर्ण झाली आहे.

उजनीतून १ लाख ५० हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला होता. मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत सलग चार दिवस १ लाखापेक्षा जास्त विसर्ग होता.

शुक्रवारनंतर दौंड येथील विसर्ग घटत गेल्याने उजनीतून सोडण्यात येत असलेला विसर्ग कमी होत गेला. यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळाला.

उजनीत ५६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा◼️ सध्या उजनी धरणाची पाणी पातळी १०४.५७ टक्के असून, उजनीत एकूण ११९.६८ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यात ५६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.◼️ उजनी मुख्य कालवा १ हजार २०० क्युसेक, सीना माढा १८० क्युसेक तर दहिगाव ८० क्युसेक इतका विसर्ग उजनीतून सोडण्यात येत आहे.◼️ पावसाचे आणखी दोन महिने शिल्लक असल्याने उजनीतून पाणी सातत्याने सोडावे लागणार आहे.

अधिक वाचा: Gavtal Vadh : उस पिकातील गवताळ वाढ रोखण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

टॅग्स :उजनी धरणधरणपाऊससोलापूरनदीपुणेवीज