Maharashtra Weather Update गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे आणि नैऋत्य मान्सूनने राज्यातून निरोप घेतला आहे.
मात्र, १५ ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान १८ ऑक्टोबरपर्यंत विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे.
सध्याच्या अंदाजानुसार वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता आणि प्रमाण हे विदर्भ आणि मराठवाड्यात असू शकते.
जिथे या दरम्यान अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान अथवा वादळी पावसाची शक्यता राहील. तुलनेत खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस पडू शकतो.
शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
अधिक वाचा: राज्यातील 'ह्या' २५ शेतकरी गटांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे बक्षीस मिळणार; शासन निर्णय जारी
Web Summary : Maharashtra anticipates thunderstorms from October 15th-18th, impacting Vidarbha, Marathwada, and central Maharashtra. Farmers are advised to secure harvested crops. Vidarbha and Marathwada are likely to experience the heaviest rainfall.
Web Summary : महाराष्ट्र में 15 से 18 अक्टूबर तक गरज के साथ बारिश की आशंका है, जिससे विदर्भ, मराठवाड़ा और मध्य महाराष्ट्र प्रभावित होंगे। किसानों को सलाह दी जाती है कि वे काटी हुई फसलों को सुरक्षित रखें। विदर्भ और मराठवाड़ा में सबसे अधिक बारिश होने की संभावना है।