Lokmat Agro >हवामान > गेल्या २४ तासांत 'या' जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद; धरणे झाली ओव्हरफ्लो

गेल्या २४ तासांत 'या' जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद; धरणे झाली ओव्हरफ्लो

This district recorded the highest rainfall in the last 24 hours; dams overflowed | गेल्या २४ तासांत 'या' जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद; धरणे झाली ओव्हरफ्लो

गेल्या २४ तासांत 'या' जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद; धरणे झाली ओव्हरफ्लो

Maharashtra Weather Update अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाला. जूनच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी दमदार पाऊस झाला आहे.

Maharashtra Weather Update अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत या जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाला. जूनच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी दमदार पाऊस झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हितेन नाईक
पालघर : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत पालघर जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाला. जूनच्या पंधरवड्यानंतर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असला तरी दमदार पाऊस झाला आहे.

जुलै महिन्याच्या पहिल्याच चार दिवसांतही सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसांतच पाणलोट क्षेत्रांमध्येही होत असलेल्या दमदार पावसामुळे धरणांच्यापाणीसाठ्यात मोठी वाढ झालेली पाहायला मिळते आहे.

जिल्ह्यातील तीन छोटी धरणे तर भरली मात्र उर्वरित धरणातही मोठा पाणीसाठा आहे. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी समाधानकारक स्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्याला रविवार ६ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता, तर ७ ते ९ जुलैपर्यंत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

कोकणातील पाच जिल्ह्यांपैकी मागील २४ तासांत पालघर जिल्ह्यात सर्वाधिक ५४.८ मिलिमीटर इतका पाऊस झाला, तर सर्वाधिक कमी पाऊस ३१.३ मिलिमीटर पाऊस हा मुंबई उपनगरात कोसळल्याचे आपत्ती विभागाने कळविले आहे.

पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम कार्यरत करण्यात आली आहे. रविवार पहाटेपासूनच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली तो संध्याकाळपर्यंत पाऊस सुरू होता. तर सोमवार सकाळपर्यंत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचा अंदाज आहे.

'या' धरणांची पाणीपातळी वाढली
धामणी धरण ८२.७४% कवडास धरण ४४.७८ टक्के आणि वांद्री धरण ४०.१४ टक्के भरले आहे, कुझें धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धामणी धरणातून ४०६१.०० तर कवडास धरणातून ४५००७.०० पाणी सांडव्यातून बाहेर सोडण्यात आले आहे. धामणी धरणाची पाणी संचय पातळी क्षमता ११८.६० मीटर इतके असून ते भरले आहे. कवडास धरणात संचय क्षमता ६२.२५ मीटर इतकी असून आज ६५.० मीटर पाण्याची पातळी झाली आहे.

धरणांतून विसर्ग सुरू
छोट्या धरणांमध्येदेखील पाणीसाठा वाढला असून जव्हार येथील डोम हिरा धरण पूर्ण भरून ११६४.१९६ क्युसेक पाण्याचा विसर्ग तर मोखाड्यातील वाघ धरण पूर्ण भरले असून यातून १६३१.५२१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला. विक्रमगडमधील खांड लघुपाटबंधारे योजना धरण पूर्ण भरले असून २.२६७क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

अधिक वाचा: आंतरपीक तिखट मिरचीने आणला आर्थिक गोडवा; 'या' सासू सुनेने तीस गुंठ्यात घेतले सव्वा लाखाचे उत्पन्न

Web Title: This district recorded the highest rainfall in the last 24 hours; dams overflowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.