Lokmat Agro >हवामान > अहिल्यानगरच्या 'या' गणेश भक्तांनी मंडळाच्या शिल्लक निधीतून केलं चक्क दीड किमी नदीचे खोलीकरण

अहिल्यानगरच्या 'या' गणेश भक्तांनी मंडळाच्या शिल्लक निधीतून केलं चक्क दीड किमी नदीचे खोलीकरण

These Ganesh devotees of Ahilyanagar deepened a 1.5 km river using the remaining funds of the Mandal | अहिल्यानगरच्या 'या' गणेश भक्तांनी मंडळाच्या शिल्लक निधीतून केलं चक्क दीड किमी नदीचे खोलीकरण

अहिल्यानगरच्या 'या' गणेश भक्तांनी मंडळाच्या शिल्लक निधीतून केलं चक्क दीड किमी नदीचे खोलीकरण

गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, सजावट, मखर व दर्शनासाठीची गर्दी.... हीच पहिली ओळख असते. मात्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या पिंपळगाव माळवी (लहारे वस्ती) येथील बजरंग ग्रुपमधील युवकांनी मात्र गणेशभक्तीला वेगळाच अर्थ दिला आहे.

गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, सजावट, मखर व दर्शनासाठीची गर्दी.... हीच पहिली ओळख असते. मात्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या पिंपळगाव माळवी (लहारे वस्ती) येथील बजरंग ग्रुपमधील युवकांनी मात्र गणेशभक्तीला वेगळाच अर्थ दिला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

खासेराव साबळे

गणेशोत्सव म्हटलं की ढोल-ताशांचा गजर, सजावट, मखर व दर्शनासाठीची गर्दी.... हीच पहिली ओळख असते. मात्र अहिल्यानगर जिल्ह्याच्या पिंपळगाव माळवी (लहारे वस्ती) येथील बजरंग ग्रुपमधील युवकांनी मात्र गणेशभक्तीला वेगळाच अर्थ दिला आहे. आठ वर्षापूर्वी एकत्र आलेल्या या तरुणांनी फक्त उत्सव साजरा न करता 'गणपती बाप्पाची खरी आराधना म्हणजे समाजोपयोगी काम' या भावनेतून जलसंधारणाचा उपक्रम सुरू केला.

२०१८ साली मंडळाच्या शिल्लक रकमेतून त्यांनी सीना नदी खोलीकरणाच्या कामाची सुरुवात केली. सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेले हे कार्य ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग, स्थानिक दानशूर व्यक्तींचे सहकार्य, सामाजिक संस्थांची मदत आणि नाम फाउंडेशनच्या पाठबळामुळे मोठ्या प्रमाणावर विस्तारले. टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या या कामामुळे आज दीड किलोमीटर नदी खोलीकरण पूर्ण झाले आहे.

नदी खोलीकरणाचा दूरगामी फायदा

गेल्या मे महिन्यात झालेल्या थोड्याशा पावसामुळेच या खोलीकरणाचा परिणाम दिसून आला. परिसरातील बंधारे समाधानकारक पाण्याने भरले, विहिरींमध्ये पाणी साठा वाढला आणि शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान मिळाले. पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. 'सामूहिक प्रयत्नांनी अशक्य वाटणारे कामही शक्य होते' याची जाणीव सर्वांना झाली आहे.

हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र

Web Title: These Ganesh devotees of Ahilyanagar deepened a 1.5 km river using the remaining funds of the Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.