Lokmat Agro >हवामान > कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा?

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा?

'These' four dams in Kolhapur district are 100 percent full; How much water is stored in other dams? | कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा?

कोल्हापूर जिल्ह्यातील 'ही' चार धरणे १०० टक्के भरली; इतर धरणांत किती पाणीसाठा?

सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे.

सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही पाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाची उघडझाप सुरू होती. अधूनमधून जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातहीपाऊस सुरू असून, दूधगंगा धरण ५० टक्के भरले आहे.

राधानगरी धरण ६५ तर वारणा ७० टक्के भरले आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, आजरा, गगनबावडा तालुक्यांत तुलनेत अधिक पाऊस आहे.

रविवारपासून वातावरणात बदल झाला असून, पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळपासून अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.

सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ९.४ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस ३०.४ मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रातही सरासरी ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राधानगरी धरणातून प्रतिसेकंद २३४८ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून ९१०९ तर दूधगंगा धरणातून ४७७५ घनफूट पाणी नदीमध्ये येत असल्याने नद्यांची पातळी दिवसभरात स्थिर राहिली आहे.

पंचगंगा नदीची पातळी २७.०८ फुटावर कायम आहे. अद्याप ३२ बंधारे पाण्याखाली आहेत. आगामी दोन दिवसांत पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

धरण भरल्याची टक्केवारी
वारणा ७०%
राधानगरी ६५%
दूधगंगा ५०%

ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली
घटप्रभा, जांबरे, सर्फनाला, कोदे.

धरण - क्षमता (टीएमसी) - सद्याचा पाणीसाठा
राधानगरी - ८.३४ - ५.४३
तुळशी - ३.४१ - २.१७
वारणा - ३४.३९ - २४.०१
दूधगंगा - २५.३९ - १२.४१
कासारी - २.७७ - १.७०
कडवी - २.५३ - १.७४
कुंभी - २.७१ - १.७३
पाटगाव - ३.७१६ - २.७६
कोयना - १०५.२५ - ५१.२१
धोम - १३.५० - ८.०१
कण्हेर - १०.१० - ६.७७
उरमोडी - ९.९६ - ७.१४
तारळी - ५.८५ - ३.६७
बलकवडी - ४.०८ - १.१८

अधिक वाचा: छाती एवढ्या पाण्यातून कांदा आणला विक्रीला; यंदा तरी आमच्या कष्टाच सोनं होणार का?

Web Title: 'These' four dams in Kolhapur district are 100 percent full; How much water is stored in other dams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.