देवराष्ट्रे : ताकारी योजनेचे सात पंप सुरू केले असून, आतापर्यंत तीस किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचले आहे. तर, २० किलोमीटर पर्यंतची कालव्यावरील पोटपाटाची दारे खुली करण्यात आली आहेत.
तसेच टप्पा क्रमांक तीनही सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ताकारी योजनेचे रब्बी हंगामातील पहिले आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू केले आहे.
सध्या टप्पा क्रमांक तीन सुरू करून सोनसळ डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. त्यामुळे या परिसरातील तेरा गावांना याचा लाभ मिळणार आहे.
तसेच मूळ कालव्यातून ३० किलोमीटरपासून पाणी गेले असून, सध्या २० किलोमीटरपर्यंतची दारे खुली करण्यात आली आहेत.
टप्प्याटप्प्याने योजनेची विद्युत मोटरची संख्या वाढवून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी वाढवण्यात येणार आहे. पाण्याची तीव्र टंचाई असूनसुद्धा शेतकऱ्यातून पाणी मागणी अर्ज अल्प प्रमाणात मिळाले आहेत.
त्यामुळे ताकारी योजनेला शेतकऱ्यांतून मिळणारा प्रतिसाद हा अल्प आहे. अनेक शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरण्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीचे आव्हान उभे आहे.
अधिक वाचा: पूरबाधित शेतकऱ्यांच्या चालू कर्जाचे पुनर्गठन होणार; कर्ज माफीची संधी मिळणार का?
