Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?

हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?

Snowfall in the Himalayas, cold winds to South India; How will the cold weather be forecasted? | हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?

हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?

Maharashtra Weather Update शनिवारपासून बुधवारपर्यत मुंबईचे किमान तापमान १६ तर, राज्याचे १० अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Update शनिवारपासून बुधवारपर्यत मुंबईचे किमान तापमान १६ तर, राज्याचे १० अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे.

मुंबई : ऑक्टोबर महिना पावसाच्या सरींत गेल्यानंतर आता नोव्हेंबर थंडी घेऊन येणार आहे. हिमालयातील हवामान बदलामुळे दक्षिण भारताकडे शीत वारे वाहू लागले आहे.

शनिवारपासून बुधवारपर्यत मुंबईचे किमान तापमान १६ तर, राज्याचे १० अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर का होईना हुडहुडी भरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

बंगालच्या उपसागरात आलेले मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले.

त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हीटचे चटके बसले नाहीत. हा महिना सुखावह गेला असतानाच त्यात आणखी भर पडणार असून, नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडी अनुभवता येईल.

गुरुवारी जारी केलेल्या आयएमडीच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या २ आठवड्यांत म्हणजे ७-२० नोव्हेंबरदरम्यान किमान आणि कमाल तापमान सामान्यापेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. - कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे थंड वारे दक्षिण भारताकडे वाहू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान १६ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३० नोंदविले जाईल. राज्याचे कमाल तापमान २६ तर किमान तापमान १२ ते १० अंश सेल्सिअस असेल. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होईल. - अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

महाराष्ट्रात भागपरत्वे कमाल तापमान २८ ते ३२ तर किमान तापमान १८ ते २० अंश आहे. येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या अटकाव नाही. आकाश निरभ्र आहे. महाराष्ट्रात थंडीची शक्यता आहे. शनिवारपासून कमाल व किमान तापमानात महाराष्ट्रात हळूहळू २ ते ३ अंशांनी घसरण होऊन संपूर्ण महाराष्ट्रात थंडीला सुरूवात होईल. - माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

अधिक वाचा: हिवाळ्यात का वाढतो हार्ट अटॅकचा धोका? काय आहेत कारणं? जाणून घ्या सविस्तर

Web Title : हिमालय की बर्फबारी से दक्षिण भारत में शीतल हवाएं: शीतकालीन पूर्वानुमान

Web Summary : अक्टूबर की बारिश के बाद, नवंबर में ठंडक आएगी। हिमालयी मौसम में बदलाव से ठंडी हवाएं दक्षिण की ओर चलेंगी, जिससे महाराष्ट्र का न्यूनतम तापमान 10 डिग्री सेल्सियस तक गिर जाएगा। दिवाली में ठंड की उम्मीद है। विशेषज्ञों ने अगले दो हफ्तों के लिए सामान्य से कम तापमान का अनुमान लगाया है, जिसके साथ महाराष्ट्र में धीरे-धीरे ठंड बढ़ेगी।

Web Title : Himalayan Snowfall Brings Cold Winds to South India: Winter Forecast

Web Summary : After October's rains, November brings cooler temperatures. Himalayan weather shifts send cold winds south, lowering Maharashtra's minimum temperatures to 10°C. Expect a chilly Diwali. Experts predict lower than normal temperatures for the next two weeks, with gradual cooling across Maharashtra.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.