cold wave उत्तर भारतात थंडीची लाट असून दिल्ली, पंजाब, राजस्थानसह बहुतेक राज्यांत रात्रीचे तापमान ५ ते ९ अंशांपर्यंत उतरले आहे.
या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह गुजरातच्या काही भागांतही पारा उतरला असून, उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे.
उत्तरेकडील राज्यांत या आठवड्यात थंडीची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे. परिणामी महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार आहे.
उत्तर भारतातून महाराष्ट्र सीमेपर्यंत ताशी १० किमी येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या कोणताही अटकाव नाही. शिवाय आकाश निरभ्र असून यातून मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रात संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात थंडीची शक्यता आहे.
संपूर्ण नोव्हेंबर महिना चांगल्या थंडीचा
◼️ सध्या उत्तर भारतात बळकट पश्चिमी झंझावातातून हंगामाला साजेशी बर्फवृष्टी होत आहे. शिवाय महाराष्ट्रात आकाश निरभ्र जाणवत आहे.
◼️ महाराष्ट्रसहीत संपूर्ण वायव्य भारतात हवेच्या दाबात ४ ते ६ हेक्टापास्कलने वाढ होऊन १०१६ हेक्टापास्कल अशा एकसमान व एकजिनसी हवेचा दाब आहे. त्यामुळे हवेच्या घनतेत वाढ होत आहे.
नाशिकला हुडहुडी, निफाड ९ अंशांवर
नाशिक जिल्ह्यात थंडीची लाटसदृश स्थितीमुळे नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. शनिवारी निफाडमध्ये ९, तर नाशिकमध्ये १०.३ अंश सेल्सिअसपर्यंत पाारा घसरला.
अधिक वाचा: राज्य शासनाच्या 'या' अभियानांतर्गत घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये मिळणार आता ५० टक्के सवलत
