Lokmat Agro >हवामान > चार दिवसांत सिद्धेश्वरच्या जलसाठ्यात २५ टक्के वाढ; जिवंत पाणीसाठ्याची पातळी पोहोचली ५१ टक्क्यांवर

चार दिवसांत सिद्धेश्वरच्या जलसाठ्यात २५ टक्के वाढ; जिवंत पाणीसाठ्याची पातळी पोहोचली ५१ टक्क्यांवर

Siddheshwar's water storage increased by 25 percent in four days; Live water storage level reached 51 percent | चार दिवसांत सिद्धेश्वरच्या जलसाठ्यात २५ टक्के वाढ; जिवंत पाणीसाठ्याची पातळी पोहोचली ५१ टक्क्यांवर

चार दिवसांत सिद्धेश्वरच्या जलसाठ्यात २५ टक्के वाढ; जिवंत पाणीसाठ्याची पातळी पोहोचली ५१ टक्क्यांवर

तीन जिल्ह्यांतील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत गेल्या चार दिवसांत झपाट्याने २५ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक होऊन धरणातील जिवंत पाणीसाठ्याची पातळी ५१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

तीन जिल्ह्यांतील सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत गेल्या चार दिवसांत झपाट्याने २५ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक होऊन धरणातील जिवंत पाणीसाठ्याची पातळी ५१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांतील सिद्धेश्वर धरणाच्यापाणीपातळीत गेल्या चार दिवसांत झपाट्याने २५ टक्क्यांनी वाढ नोंदविली गेली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयात मोठ्या प्रमाणात आवक होऊन धरणातील जिवंत पाणीसाठ्याची पातळी ५१ टक्क्यांवर पोहोचली आहे.

हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या सिद्धेश्वर धरणाच्या पाणीपातळीत गत चार दिवसांत लक्षणीय वाढ नोंदविली गेली. जुलै महिन्याच्या मध्यापर्यत २० टक्केच्या आत असलेला सिद्धेश्वर धरणाचा जिवंत पाणीसाठा दोन दिवसांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे रविवारी ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचला.

जलाशयावर अवलंबून असलेल्या हिंगोलीसह परभणी व नांदेड जिल्ह्यातील शपाणीपुरवठा योजनेसह रब्बी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

शेतकऱ्यांत आनंद

• लाभक्षेत्रातील शेतीच्या सिंचनासाठी मुख्य साठा असलेल्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात वाढ होऊन सद्यस्थितीत धरणातील साठा ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.

• सिद्धेश्वर जलाशयावर हिंगोली २ जिल्ह्यातील २२ हजार ६५८ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील १६ हजार १४२ आणि नांदेड जिल्ह्यातील १९ हजार १८८ असे एकूण ५८ हजार हेक्टर शेतीच्या रब्बी व उन्हाळी हंगामाचे सिंचन अवलंबून आहे.

• जलाशयातून उपसा सिंचनाद्वारे जिल्ह्यातील ३ हजार हेक्टर शेतीचे सिंचन होते. शेती सिंचनाबरोबरच वसमत, परभणी, हिंगोली, पूर्णा शहरासह केसापुरी, पुरजळ २२ गाव, पिंपळगाव २३ गाव, वस्सा १२ गाव, सिद्धेश्वर ५ गाव, परभणी ग्रामीण १८ गाव अशा विविध पाणीपुरवठा योजना सिद्धेश्वर जलाशयातून कार्यान्वित आहेत.

हेही वाचा : UPSC सोडली; शेती केली! आपल्याच शेतातून केळीचा कंटेनर निर्यात करणारा युवा शेतकरी

Web Title: Siddheshwar's water storage increased by 25 percent in four days; Live water storage level reached 51 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.