मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले असून सोमवारी पूर्णा नदीपात्रात १४ दरवाजांतून पाण्याचा विसर्ग करणे सुरू करण्यात आले.
तसेच धरण प्रशासनाच्या वतीने नदीकाठाच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला. सध्या १० दरवाजे एक फुटाने तर ४ दरवाजे दोन फुटाने उघडण्यात आले आहेत. पूर्णा नदीपात्रात १४ हजार ६८१ क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
यासोबतच येलदरी धरणाचे ४ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले आहेत. विद्युत निर्मितीचे तिन्ही दरवाजे उघडले असून पूर्णा नदीपात्रात एकूण ११ हजार १४० क्युसेक पाणी सिद्धेश्वर धरणात येत असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली.
दरम्यान परिसरातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले आहे. तसेच विसर्ग वाढवल्याने पूर्णा नदी पात्राजवळील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे देखील नुकसान झाले आहे.
हेही वाचा : करटुल्यांची लागवड कशी करावी; बियाणं, कंद की कलम? जाणून घ्या सविस्तर करटुले लागवड तंत्र