Lokmat Agro >हवामान > तीव्र उन्हाळ्याच्या चटक्यांचा होतोय आरोग्यावर परिणाम; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

तीव्र उन्हाळ्याच्या चटक्यांचा होतोय आरोग्यावर परिणाम; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

Severe summer heatwaves are affecting health; Health Department appeals to take care | तीव्र उन्हाळ्याच्या चटक्यांचा होतोय आरोग्यावर परिणाम; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

तीव्र उन्हाळ्याच्या चटक्यांचा होतोय आरोग्यावर परिणाम; काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

सध्या राज्यात उन्हाळ्याचे चटके अधिकच तीव्र झाले असून तापमानात लक्षणीय वाढ झालेली आहे. या वातावरणीय बदलाचा आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

तापमानात झालेल्या या वाढीमुळे वातावरण कोरडे आणि दमट बनते, ज्यामुळे विषाणू व जीवाणूंचा प्रसार सुलभ होतो. परिणामी सर्दी, खोकला, घशाला खवखव, ताप, डायरिया, आणि त्वचेच्या समस्या यासारखे आजार वाढू लागले आहेत. लहान मुले, वृद्ध नागरिक, आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये या रोगांचा प्रादुर्भाव अधिक होत आहे.

उष्णतेचा थेट परिणाम शरीराच्या तापमान नियंत्रण यंत्रणेवर होतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन डिहायड्रेशन होण्याचा धोका निर्माण होतो. अनेकांना उष्माघाताचा त्रास न जाणवता थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो.

आरोग्य विभागाने यासंदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः उन्हात बाहेर जाणे टाळावे, गरज असल्यास डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. शक्य तितक्या प्रमाणात पाणी, लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यासारख्या द्रव पदार्थांचे सेवन करावे. घराबाहेर पडताना हलके व सैलसर सूती कपडे घालावेत. उघड्यावर विक्रीस असलेले खाद्यपदार्थ टाळावेत.

'हे' उपाय करा 

संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सकारात्मक मानसिकता यामुळे आपल्याला आजारांपासून बचाव करता येतो.

हेही वाचा : शेतकरी बांधवांनो 'हे' सोपे उपाय येतील कामी; हृदयाविकाराची सुटेल चिंता सारी

Web Title: Severe summer heatwaves are affecting health; Health Department appeals to take care

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.