Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; राज्यातील 'या' जिल्ह्यात नोंदविले सर्वात कमी तापमान

महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; राज्यातील 'या' जिल्ह्यात नोंदविले सर्वात कमी तापमान

Severe cold in Maharashtra; Lowest temperature recorded in 'this' district of the state | महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; राज्यातील 'या' जिल्ह्यात नोंदविले सर्वात कमी तापमान

महाराष्ट्रात कडाक्याची थंडी; राज्यातील 'या' जिल्ह्यात नोंदविले सर्वात कमी तापमान

maharashtra weather update उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे.

maharashtra weather update उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे.

मुंबई : उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे.

याचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा खाली नोंदविण्यात येत आहे.

गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईकरांना माथेरानचा फिल येत असल्याचे चित्र आहे.

यापेक्षाही जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये होती. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून येथून शीत वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत.

त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक शहरांचे किमान तापमान ६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येत आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागांचा समावेश आहे.

राज्यातील शहरांचे किमान तापमान (अंश. से)
अहिल्यानगर - ६.६
पुणे - ७.९
नागपूर - ८.१
नाशिक - ८.२
नांदेड - ८.८
मालेगाव - ८.८
वर्धा - ९.९
यवतमाळ - १०
सातारा - १०
अकोला - १०
धाराशिव - १०.२
गडचिरोली - १०.२
अमरावती - १०.२
परभणी - १०.४
छ. संभाजीनगर - १०.८
चंद्रपूर - १०.८
वाशिम - ११
महाबळेश्वर - ११.१
बुलढाणा - १२.२
सांगली - १२.३
नंदुरबार - १२.४
सोलापूर - १३.२
कोल्हापूर - १४.४
डहाणू - १५.२
मुंबई - १५.६
माथेरान - १७.४

उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारेगार झाला असून शुक्रवारी देखील थंडीचा कडाका कायम राहील. विशेषतः मध्य महाराष्ट्रामध्ये किमान तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पुणे आणि मुंबई या शहरात देखील किमान तापमान कमीच राहील. - कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

अधिक वाचा: आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले व नोंदी आता रद्द होणार; काय आहे निर्णय?

Web Title : महाराष्ट्र में कड़ाके की ठंड: अहिल्यानगर में सबसे कम तापमान दर्ज

Web Summary : महाराष्ट्र में शीत लहर, अहिल्यानगर में सबसे कम तापमान 6.6 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया। कई शहरों में तापमान गिरा, जिससे मराठवाड़ा और विदर्भ जैसे क्षेत्र प्रभावित हुए। उत्तरी भारत से ठंडी हवाएं मुख्य कारण हैं।

Web Title : Maharashtra Shivers: Ahilyanagar Records Lowest Temperature Amid Cold Wave

Web Summary : Maharashtra experiences a cold wave, with Ahilyanagar recording the lowest temperature at 6.6°C. Many cities see temperatures plummeting, impacting regions like Marathwada and Vidarbha. Cold winds from North India are the primary cause.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.