Join us

Radhanagari Dam : राधानगरी धरणक्षेत्रात जोरदार पाऊस; धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 11:25 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारपासून पावसाची जोर काहीसा वाढला असून, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दुपारपासून पावसाची जोर काहीसा वाढला असून, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड तालुक्यात तुलनेत अधिक आहे.

धरण क्षेत्रातही पाऊस दमदार सुरू आहे. राधानगरी धरण ९२ टक्के भरले असून, कोल्हापूरकरांनी धाकधूक वाढली आहे. धरणातील विसर्ग कमी असला तरी पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात फुटाने वाढली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून, बुधवारी सकाळपासून मात्र पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारनंतर एकसारखा पाऊस सुरू झाला असून. कोल्हापूर शहरात अधूनमधून जोरदार सरीही कोसळल्या.

जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढू लागला आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्यात मगरी ४९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

गगनबावडा तालुक्यात ३३.२ मिलिमीटरची नोंद झाली आहे. राधानगरी धरणक्षेत्रात दिवसभरात १८ मिलिमीटर दुधगंगा धरणक्षेत्रात १२ तर सर्वाधिक ७२ मिलिमीटर पाऊस कुंभी धरणक्षेत्रात पाऊस झाला.

राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १५००, वारणातून ४४०० तर दुधगंगातून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची पातळी १७.७ फुटांवर असून, आठ बंधारे पाण्याखाली आहेत.

दरम्यान, राधानगरी धरण ९२ टक्के भरले आहे, पावसाचा जोर वाढला असून यामुळे कोल्हापूरकरांची धाकधूक वादली आहे.

अधिक वाचा: ऊसदर नियंत्रण बैठक झाली; एफआरपी व इतर ऊस प्रश्नांविषयी काय चर्चा? वाचा सविस्तर

टॅग्स :धरणपाऊसहवामान अंदाजकोल्हापूरनदीपाणी